Ambadas Danve : पाकिस्तानी बॉन्ड, आयपीएल बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप; विधानपरिषदेत अंबादास दानवेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब

Ambadas Danve Latest News : विधानपरिषदेत अंबादास दानवे यांनी पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला आहे. आयपीएल बेटिंगवरून मुंबई पोलिसांवर दानवेंनी गंभीर आरोप केला आहे.
Ambadas Danve News
Ambadas DanveSaam tv
Published On

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. दानवेंनी विधान परिषद सभागृहात पेनड्राईव्ह बॉम्ब टाकलाय. मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आयपीएल सामन्यांची बेटिंग सुरु असल्याचा आरोप केला आहे. यासाठी पाकिस्तानी लोकांसोबत संभाषण होते. त्यासाठी मुंबई पोलीस दलातील अधिकारी मदत करतात, याबाबतची माहिती दानवेंनी दिली आहे. अंबादास दानवे यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Ambadas Danve News
Kunal Kamra : कामराच्या गाण्यावरून महिला नेत्यांमध्ये जुपंली; सुषमा अंधारेंच्या टीकेला ज्योती वाघमारेंकडून गाण्यातून प्रत्युत्तर, पाहा व्हिडिओ

विरोधी पक्षनेते बड्या अधिकाऱ्यांच्या मदतीमुळे बेटिंग सुरु असल्याच्या आरोपामुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. बेटिंग करणाऱ्यांमध्ये मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तीचा समावेश असल्याचा आरोप दानवेंनी केला आहे. या बेटिंगसाठी पाकिस्तानी खेळाडूंचा आरोप होत असल्याचाही आरोप दानवेंनी केला आहे. तर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये लोटस २४ अॅपच्या माध्यमातून बेटिंग करण्यात आली. त्यानंतर या सर्व व्यक्ती मुंबईत आयपीएलसाठी आल्याचा आरोप दानवेंनी केलाय.

Ambadas Danve News
Ladki Bahin yojana : सरकार वचन पाळणार, लाडकीला 3000 मिळणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

दानवे नेमकं काय म्हणाले?

अंबादास दानवे म्हणाले की, 'माझ्याकडं एक पेनड्राईव्ह आहे. तो पेनड्राईव्ह सभापती महोदय देत आहे. क्रिकेटसाठी बेटिंग लोटस २४ नावाचे अॅप आहे. मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन यात बेटिंग करतात. त्यांचा पाकिस्तानी खेळाडूंशी संपर्क आहे. त्यांच्या मुंबई पोलिसांसोबतही खुलेआम बैठका होतात. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये लोटस २४ नावाच्या अॅपच्या माध्यमातून बेटिंग करण्यात आली. या सर्व व्यक्ती आता आयपीएलसाठी मुंबईत आल्या आहेत. पोलिसांच्या हक्काने सर्व गोष्टी होत आहेत, असा गंभीर आरोप दानवे यांनी केला. पेनड्राईव्हमध्ये पाकिस्तांनी लोकांसोबत संभाषण आहे. त्याला मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांची मदत होते, असा दानवे यांनी केला आहे.

Ambadas Danve News
Share Market today : शेअर बाजारात सलग सातव्या दिवशी हिरवळ; सेन्सेक्स ७८००० पार, कोणते १० शेअर चमकले?

राज्यात गुजरातमार्गे मोठ्या प्रमाणात गुटखा येतो. आष्टीत १८ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलाय. गडचिरोतील गुटखा टपरीवाल्यांकडील १० लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलाय. गुजरातमधून पोलिसांच्या संरक्षणात गुटखा येतोय. तुम्ही टपरीवाल्यांवर काय कारवाई करता? असा सवाल दानवे यांनी केला.

पालघरमधील पोलीस अधिकारी, परिवहन विभागाचे अधिकारी मदत करतात. आष्टीत दोन लाखांची कारवाई करतात. गडचिरोलीत १० लाखांची कारवाई करतात. तुम्हाला कारवाई करायची असेल तर पालघर पोलीस अधिकारी आणि परिवहन अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असं दानवेंनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com