Mumbai Police: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या? कुटुंबाचा आरोप

Mumbai police officer suicide: मलाडमधील कुरार पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. राहत्या घरात गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली.
Police
PoliceSaam Tv News
Published On

मलाडमधील कुरार पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. राहत्या घरात गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी गळफास घेत आत्महत्या का केली? आत्महत्या करण्याचं नेमकं कारण काय? याचा शोध सुरू आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबानं केला आहे.

कुरार पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस कर्मचारी यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांनी आपलं आयुष्य राहत्या घरात संपवलं आहे. सुभाष कांगणे असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून, त्यांनी आत्महत्या का केली? याचा शोध सुरू आहे.

Police
Dhananjay Munde: मुंडेंची घटीका जवळ आलीय, आता फक्त अजित पवारांनी...सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

याप्रकरणी इतर पोलीस कर्मचारी अनेक अंदाज लावत आहेत. एका प्रकरणाच्या तपासाबाबत मानसिक छळाला कंटाळून कांगणे यांनी आत्महत्या केली. अशी शंका उपस्थित होत आहे. तर, पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबानं वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला आहे.

Police
Social Media: अरे देवा! डोक्यावर हेल्मटऐवजी खांद्यावर पोपट, ट्रॅफिकमधून वाट काढत महिला सुस्साट; Video व्हायरल

पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाने सुभाष कांगणे यांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. डीसीपी स्मिता पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com