Nana Patole on Badlapur Case : बदलापूरच्या 'त्या' शाळेत ब्लू फिल्म बनवायचे; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

nana patole News : नाना पटोले यांनी बदलापूर प्रकरणारवरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोलेंच्या गंभीर आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Nana Patole
Nana Patole saam tv
Published On

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही प्रतिनिधी

नांदेड : बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. त्या प्रकरणानं संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. आता या प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा नवं वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान, बदलापूरच्या त्या शाळेत ब्ल्यू फिल्म बनवल्या जायच्या, असा दावा नाना पटोलेंनी केल्यानंतर खळबळ उडाली आहे. ते नांदेडमधील एका जाहीर सभेत पटोलेंनी भाष्य केलं आहे. महायुती सरकारच्या काळातील राज्यातील परिस्थितीवर भाष्य करताना पटोलेंनी बदलापूरमधील शाळेत घडलेल्या प्रकरणाच उल्लेख केला. त्यावेळी त्यांनी बदलापूरमधील शाळेत 'ब्ल्यू फिल्म' तयार केल्या जायच्या असा दावा केला. तसेच या शाळेत अवयव विक्रीचं काम चालायचं, असाही गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला. यावेळी त्यांनी ती शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचं म्हटलं आहे.

Nana Patole
Nana Patole : एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सर्टिफिकेट देण्यापेक्षा....; नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना खणखणीत टोला

नाना पटोलेंनी काय म्हटलं?

बदलापूरमधील शाळेत लहान मुलींच्या अश्लील चित्रफिती तयार करण्यात यायच्या. या शाळेत अवयवांची विक्री करण्याचे उद्योग सुरु होते,' असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला आहे. बदलापूरमधील ही शाळा आरएसएसशी संबंधित असल्याने सरकारनं या शाळेवर मेहेरबानी केल्याचा आरोप पटोलेंनी केला आहे.

Nana Patole
Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरण : पहिल्या दिवशी अटक, दुसऱ्या दिवशी ट्विस्टवर ट्विस्ट, एकाच वेळी जामीन आणि लगेच अटक

बदलापुरातील या शाळेत चार-पाच वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाले नसून असंख्य मुलींवर अत्याचार झाले. न्यायालयानं चौकशीचे देखील दिले. शाळा आरएसएसशी संबंधित असल्यानं राज्य सरकारनं त्यांच्या संचालक मंडळावर कारवाई केली नाही. माहितीच्या अधिकारातून एका व्यक्तीने मागितली आहे. बदलापुरातील त्या शाळेत ब्ल्यू फिल्म फिल्म, पिक्चर तयार करण्याचं, शरीराचे अवयव विकण्याशी संबंधित एक जनहित याचिका करण्यात आली आहे, असं नाना पटोले भाषणात म्हणाले.

Nana Patole
Amit Shah : राहुल गांधींची चौथी पीढी आली तरी...; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगलीतून काय इशारा दिला?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com