या सरकारचे नागपूर येथील अधिवेशन हे शेवटचे असेल. पुढचं नवीन सरकार येईल त्याच पहिला अधिवेशन पुढे होईल, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय. येत्या ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे. या अधिवेशनात विरोधक सरकारलाला विविध मुद्यांवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. अधिवेशनात विरोधक आक्रमक भूमिका घेणार असल्याचं दिसत आहे. याची झलक नाना पटोलेंच्या इशाऱ्यातून दिसत आहे. (Latest News)
शेती, शेतकरी, डेंग्यू, रोजगार, मराठा आरक्षण आदी मुद्द्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरणार आहे. विदर्भातील अनेक मुद्दे आहेत. शेतकऱ्यांना पावसाची मदत मिळाली नाही. रोजगार नाही फक्त वाऱ्यावर सोडणार नाही, असं वाक्य वारंवार बोललं जातं मात्र सरकार मदत करत नाही. शेतकऱ्यांच्या अधिकाराची लढाई काँग्रेस पक्ष लढेल, त्यासाठी ११ तारखेला नागपुरात मोठा आंदोलन करण्यात येणार आहे. अधिवेशनादरम्यान हे आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिलाय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नागपुरात मोठा पूर आला त्याची मदत सुद्धा अजूनपर्यंत लोकांना मिळाली नाहीये. डेंग्यूचा आजार प्रशासकीय व्यवस्थेमध्ये पसरलाय. कल्याणमध्ये एका बाळाचा जन्म झाला, मात्र डेंग्यूमुळे त्याला आपली आई गमवावी लागली. हे सरकार सध्या निवडणुका घ्यायला तयार नाही. नागपूरचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे विधानसभेवर हल्लाबोल करण्याची रणनीती आम्ही ठरवलेली आहे. सगळेच प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही घेणार असल्याचं पटोले म्हणाले.
नागपूरच्या मिहानचा विकास होत नाही. मात्र सरकार आश्वासन देते. हजारो नोकऱ्या देऊ पण शेतकऱ्यांना न्याय देत नाही. युवकांना रोजगार मिळत नाही. मात्र सरकारच्या बगलबच्चांना काम मिळतं.
अशा प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या काळात ११ तारखेला काँग्रेस पक्ष हल्लाबोल मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा थेट विधिमंडळावर धडकणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, महागाई, पावसामुळे नुकसान झालेल्यांना मदत करण्याबाबत राज्य सरकारची उदासीन भूमिका आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरता काँग्रेस हिवाळी अधिवेशनात हल्लाबोल आंदोलन करणार आहे. आंदोलनात करू आमच्यासोबत महाविकास आघाडीतील पक्ष आले तर त्यांचे स्वागत आहे.
या आंदोलनाला राज्यभरातून लाखो लोक येतील. महाराष्ट्रातील सगळ्या नेत्यांना सुद्धा आम्ही सूचना केलेल्या आहेत. शेतकऱ्यांना जे राज्यभरात नुकसान झालं आहे. ते प्रश्न आम्ही मांडणार असल्याचं पटोले म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.