Shraddha Thik
येत्या ७ डिसेंबर २०२३ ते २० डिसेंबर २०२३ पर्यंत विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन होणार आहे.
नागपूर येथे अधिवेशन होणार असून एकूण दिवस १४ दिवसापैंकी प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, सुट्या ४ दिवस असतील.
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपुरलाच का होते असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल?
संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर नागपुरला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला आणि यावेळी नागपूर येथे एक अधिवेश घेण्याची मागणी करण्यात आली.
सुरूवातीला १९६० मध्ये विदर्भातले नेते अधिवेशनात सामिल होत नव्हते म्हणून नागपूर येथे अधिवेशन घेण्यात आले.
महाराष्ट्राच्या विधीमंडळात आमदार आगामी विधेयकं, स्थानिक आणि राज्यपातळीवरचे प्रश्नांवर चर्चा करतात.
दरवर्षी विधानसभेचे अर्थसंकपल्पीय, पावसाळी आणि हिवाळी असे तीन अधिवेशन भरतात.
विधिमंडळ अधिवेशनात सदस्यांची चर्चा होते प्रश्न आणि उत्तरांसाठी अधिवेशन महत्त्वाचे असते.