Manoj Jarange Patil : तर २ तासांतच मराठा आरक्षण मिळू शकतं; मनोज जरांगे पाटील यांनीच सांगितलं कसं?

Jalgaon News : आरक्षण असलेलाही व आरक्षण नसलेलाही सर्व मराठा समाज एकत्र आला आहे. खान्देशातील मराठा समाजाशी संवाद साधण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी आज खानदेशात आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam tv
Published On

जळगाव : आरक्षणासाठी गोरगरिबांना लढायची वेळ आली. मराठा आमदारांनी पुढाकार घेतला असता तर गोरगरीब कशाला रस्त्यावर उतरला असता. तसे पहिले तर आमचं वाटोळ मराठा आमदारांमुळे झालं असून या आमदारांमुळेच आरक्षणाला (Maratha Aarkshan) काडी लागली आहे. जर मराठा आमदार एकत्र आले, तर दोन तासात आरक्षण मिळू शकते. खासदार आणि मंत्री जरी एकत्र झाले (jalgaon) तरी दोन तासात मराठा आरक्षण मिळू शकते, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे. (Breaking Marathi News)

Manoj Jarange Patil
Shahapur News : संविधान दिनी शिक्षक गैरहजर; शिक्षकांवर निलंबनाच्या कारवाईची मागणी

मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील हे राज्यभर दौरा करत आहेत, या दौऱ्यात जरांगे पाटील हे खान्देश दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना (Chalisgaon) चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यासमोर जरांगे पाटील यांचा मराठा आमदारांवर निशाणा साधला. जरांगे पाटील म्हणाले कि महाराष्ट्रातील गोरगरिबांचे कल्याण व्हावं; यासाठी आरक्षण असलेलाही व आरक्षण नसलेलाही सर्व मराठा समाज एकत्र आला आहे. खान्देशातील मराठा समाजाशी संवाद साधण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी आज खानदेशात आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil
Leopard Attack: शेळी चराईला गेलेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला; आरडाओरड केल्याने बचाव

तर  व्यासपीठावर घुसू देणार नाही
नारायण कूचे यांनी माफी मागितली ते ठीक आहे; पण तुम्ही असे वागताच का? नारायण कुचे केवळ मतदार संघापुरताच नाही तर आमच्या आंदोलनात मध्यस्थी असायचे. कुचे यांना आम्ही एवढा मान सन्मान दिला तरी त्यांनी खोटे नावे सांगितलीच कशी? आमच्या मनातील सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतो त्यावेळेस आम्ही तुमची जात नाही बघितली. आम्ही तुमच्यातला लोकप्रतिनिधी बघितला नाही. तुमच्यात माणुसकी किती जिवंत आहे हे बघितलं. पाच महिन्यापासून प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगत राहिलो एकाएकी तुमच्यातली जात कशी जागी झाली. तुम्हाला त्रास होत नाही तुम्ही रात्रंदिवस आमच्या व्यासपीठावर फिरायचे. आम्हाला त्रास द्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला आमच्या व्यासपीठावर घुसू देणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com