Uday Samant: ठरलं! महायुतीचं लोकसभेत ४८ तर, विधानसभेत २०० प्लसचं मिशन; सामंतांनी सांगितला पुढचा प्लान

Uday Samant on Election Results: उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना महायुतीचं पुढील मिशन काय असेल याची माहिती दिली. पुढील लोकसभेत महायुतीचं सरकार येणार असून लोकसभेत ४८ जागा जिंकू असं ठरवलंय.
Uday Samant
Uday Samantsaam Tv
Published On

(गिरीश कांबळे)

Uday Samant On Loksabha Election:

तीन राज्यात महायुतीचा विजय झाला आहे. आता लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार आम्ही केलाय. आता तीन इंजिन आले आहेत. अजितदादांचं तिसरं इंजिन आल्याने आम्ही मिशन ४८ केलं असल्याचं विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय. माध्यम प्रतिनिधींशी बोलत असताना त्यांनी हे विधान केलंय. (Latest News)

आज चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. यात तीन राज्यात भाजपला विजय मिळवलाय. भाजपच्या विजयावर नेते प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलंय. दरम्यान राज्यातील सरकारमधील शिंदे गटाच्या नेत्यांनी या निकालांवर प्रतिक्रिया दिलीय. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही प्रतिक्रिया दिलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तीन राज्यात महायुतीचा विजय झाला आहे. आता लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार आम्ही केलाय. यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना काम करण्याचे आदेश दिलेत. आता मिशन ४५ वरून आता आम्ही मिशन ४८ केलंय. आता तीन इंजिन आले आहेत.

अजित पवार यांचे तिसरं इंजिन आल्याने आम्ही मिशन ४८ केलं आहे. यावेळी उदय सामंत यांनी लोकसभेत महायुतीच सरकार येणार असल्याचा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. लोकसभेत देखील आम्हीच जिंकणार आहोत. पंतप्रधान म्हणून नरेंद मोदी हेच राहणार असल्याचा दावा सामंत यांनी केलाय.

Uday Samant
Vijay Wadettiwar : सेमिफायनल ते जिंकले, फायनल आम्ही जिंकू, काँग्रेसला विश्वास; तेलंगणाच्या विजयाची कारणेही सांगितली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com