

नागपुरातला सन्मार्ग नगराचा परीसर...महिन्याभरापूर्वी 27 जानेवारीची दुर्घटना....वंदना देवीकर सकाळी साडेसातच्या सुमारास घरासमोरचा परीसर झाडून स्वच्छ करीत होत्या. अचानक मोकाट वळू धावत येतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो. त्यांना जमिनीवर फेकत अक्षरशः तुडवतो. या 25 सेकंदाच्या घटनेनं देवीकर कुटुंबाचं आयुष्य बदलून गेलंय.
या भयावह हल्ल्यात वंदना देवीकर यांची हाडं मोडली. छातीच्या बरगड्या तुटल्या. सर्वात गंभीर म्हणजे मेंदूला इजा झाली. तीन आठवडे आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. आत्तापर्यंत 10 लाख रुपयांचा खर्च झाला. मात्र अजुनही त्यांच्या प्रकृतीत फरक पडलेला नाही..
संतापजनक बाब म्हणजे, हल्ल्याला एक महिना उलटूनही महापालिकेचा एकही अधिकारी किंवा नगरसेवक साधी विचारपूस करायला पोहोचलेला नाही, असा देवीकर कुटुंबीयांचा आरोप आहे. मात्र वळूच्या हल्ल्यात यापूर्वीही काही नागरिक जखमी झालेत.
मोकाट गुरांचा प्रश्नावरुन नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग आली.आणि महापौरांनी अधिका-यांनी फैलावर घेतलं. सर्वच शहरांमध्ये मोकाट कुत्रे आणि जनावरांचा ज्वलंत प्रश्न आहे. उपराजधानीतील हे वळू आणखी किती नागरीकांना धडक देणार आहेत ? प्रशासन काही ठोस पाऊल उचलणार का ? हाच खरा सवाल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.