होळीसाठी गावी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेची मोठी घोषणा; अतिरिक्त गाड्या चालवणार, कधी अन् कुठे?

Holi special train : होळीसाठी गावी जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेने मोठी घोषणा केली आहे.
holi train
Holi special train Saam tv
Published On
Summary

होळी सणासाठी रेल्वेची मोठी घोषणा

२० अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार

लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दिवा स्टेशनवरून रेल्वेची सेवा

होळी सणासाठी गावी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेने रेल्वे प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे. मध्य रेल्वेकडून येत्या होळी सणात प्रवाशांच्या सोयीसाठी २० अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी २० अतिरिक्त विशेष गाड्यांची घोषणा केल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दिवा रेल्वे स्टेशनवरून या गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.

holi train
विधानसभेत खाणीचा मुद्दा गाजला; ठाकरे आणि राऊत सत्ताधाऱ्यांना भिडले, वनमंत्र्यांकडून एका वाक्यात उत्तर

१) लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगांव - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ सेवा)

ट्रेन क्रमांक 01003 साप्ताहिक विशेष दिनांक ०२.०३.२०२६ आणि ०९.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवारी ०८.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मडगांव येथे २२.४० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

ट्रेन क्रमांक 01004 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक ०१.०३.२०२६ आणि ०८.०३.२०२६ रोजी दर रविवारी मडगांव येथून १६.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.

संरचना: १८ शयनयान आणि २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.

आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 01003 साठी बुकिंग दिनांक २८.०२.२०२६ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल.

holi train
खोट्या तक्रारी करणाऱ्यांना शिक्षा होणार; सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारे, मानवाधिकार आयोगाला नोटीस

२) दिवा - चिपळूण - दिवा अनारक्षित विशेष (१६ सेवा)

ट्रेन क्रमांक 01159 अनारक्षित विशेष दिनांक ०१.०३.२०२६ ते ०८.०३.२०२६ पर्यंत दिवा येथून दररोज २३.२५ वाजता सुटेल आणि चिपळूण येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01160 अनारक्षित विशेष दिनांक ०१.०३.२०२६ ते ०८.०३.२०२६ पर्यंत चिपळूण येथून दररोज १५.३० वाजता सुटेल आणि दिवा येथे त्याच दिवशी २३.१० वाजता पोहोचेल.

थांबे : निळजे, तळोजा पांचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगांव, गोरेगांव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजणी

संरचना: ८ मेमू डब्बे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com