Election: पदवीधर निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचा दणका; कराळे मास्तरांची थेट ६ वर्षांसाठी पक्षातून हाकालपट्टी

Nagpur Graduate Constituency Election: नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नितेश कराळे यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली.
Maharashtra Politics:
NCP SHARAD PAWAR Saam tv
Published On: 

Nagpur Graduate Constituency Election : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाच्या काही तास आधी शरद पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादीने बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांना पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने याबाबत अधिकृत पत्रक जारी केले आहे.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी यांच्याविरोधात निवडणूक लढवणं आणि शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा संभ्रम निर्माण केल्याचा ठपका नितेश कराळे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून कराळे यांनी आघाडीविरोधात प्रचार केला होता. आता मतदानाच्या अवघ्या काही तासापूर्वी झालेल्या या कारवाईचा निवडणुकीवर काय परिणाम होणार, याकडे लक्ष लागलंय.

ncp
ncp
Maharashtra Politics:
Kitchen Hacks :स्टील, नॉन-स्टिक की लोखंडी? चुकीच्या भांड्यात स्वयंपाक करताय तर आजच थांबा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रात नेमकं काय आहे?

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून अभिजित गोविंदराव वंजारी निवडणूक लढवत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. परंतु, आपण पक्षाच्या धोरणांच्या व निर्णयांच्या विरोधात जाऊन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. "पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचा मला पाठिंबा आहे," अशा प्रकारचा संभ्रम मतदारसंघात निर्माण करत असल्याच्या तक्रारी पक्षाकडे आल्या आहेत. आपली ही कृती पक्षाची शिस्त, धोरणे आणि महाविकास आघाडीच्या निर्णयांचे स्पष्ट उल्लंघन करणारी आहे. यामुळे, पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष / वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशानुसार आपणास पक्षातून ६ वर्षांकरिता निष्कासित करण्यात येत आहे, याची आपण नोंद घ्यावी.

Maharashtra Politics:
Vande Bharat : महाराष्ट्रातील पहिली स्लीपर वंदे भारत १ नोव्हेंबरपासून धावणार; जाणून घ्या, तिकीट किती आणि थांबे कोणते

नागपूर पदवीधर निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची

नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी निवडून आले होते आणि हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे भाजपने यंदा गेल्या वर्षभरापासूनच जोरदार तयारी केली आहे. मतदारसंघात नव्याने मतदार नोंदणी करणे असो, बैठका घेणे असो किंवा विविध संघटनांचा पाठिंबा मिळवणे असो; भाजपने सर्वच पातळ्यांवर जोरदार बांधणी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पुढाकार घेत अनिल सोले यांची बंडखोरी शमवली. तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आशिष शेलार आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी संपूर्ण मतदारसंघ प्रचाराने पिंजून काढला आहे.

Maharashtra Politics:
Bus Fare Hike : दिवाळीनंतर खासगी बस अन् स्कूल बसच्या भाड्यात प्रचंड वाढ, किती वाढणार दर?

दुसऱ्या बाजूला, काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांच्यासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, प्रतिभा धानोरकर, नाना पटोले, सुनील केदार आणि नितीन राऊत यांनीही प्रचार केला. मात्र, या सगळ्या प्रक्रियेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मात्र दूरच राहिल्याचे पाहायला मिळाले. ही निवडणूक पसंतीक्रमाची असल्याने आणि उमेदवारांना अधिकृत पक्षचिन्ह नसल्याने, निवडणुकीचा निकाल पहिल्याच पसंतीक्रमाच्या मतमोजणीत लागतो की दुसऱ्या पसंतीक्रमाची मते मोजावी लागतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

या सर्व पार्श्वभूमीवर भाजपची मजबूत पक्षसंघटना आणि नियोजन पाहता भाजपची सरशी दिसत आहे. परंतु, आमदार अभिजित वंजारी यांनी मागील सहा वर्षांत केलेली कामे, त्यांनी आखलेली रणनीती आणि अनेक संस्था काँग्रेस नेत्यांच्या नियंत्रणात असणे या बाबी पाहता, निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com