Vande Bharat : महाराष्ट्रातील पहिली स्लीपर वंदे भारत १ नोव्हेंबरपासून धावणार; जाणून घ्या, तिकीट किती आणि थांबे कोणते

Mumbai Bengaluru Vande Bharat sleeper train launch date : मुंबई-बंगळूरु वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस १ नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. संभाव्य तिकीट दर, वेळापत्रक, पुणे-सोलापूरसह कोणत्या स्थानकात ट्रेन थांबणार...
Vande Bharat Sleeper train update
Vande Bharat Sleeper train updateSaam TV
Published On: 

Mumbai-Bengaluru Vande Bharat Sleeper Train: देशातील दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावण्यासाठी सज्ज झाली आहे. बंगळूर-मुंबई वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसच्या उद्घाटनासाठी रेल्वेने कर्नाटक राज्योत्सवाचा दिवस, १ नोव्हेंबर हा प्रस्तावित केला आहे. पण ही स्लीपर वंदे भारत कोणत्या दिवशीपासून नियमित सुरू होईल, याबाबत माहिती समोर आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाईल. दक्षिण भारतात धावणारी ही पहिलीच स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस आहे.

बंगळूरु-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या संभाव्य वेळा आणि तिकीट Bengaluru-Mumbai Vande Bharat sleeper train: Likely Timings and Fare

बंगळुरू-मुंबई (२७६५१/२७६५२) वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसमध्ये १६ डब्बे असतील. यामध्ये ११ एसी थ्री टियर, ४ एसी टू टियर आणि एक फर्स्ट क्लास डब्याचा समावेश असेल. या सर्वांमध्ये ८२३ बर्थ असतील, अशी माहिती समोर आली आहे. १,११८ किलोमीटरच्या प्रवासासाठी तिकीट दर २,६०० ते ४,२५० रुपयांपर्यंत असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने अद्याप तिकिटाचे दर अधिकृत जाहीर केलेले नाहीत.

Vande Bharat Sleeper train update
मोठी बातमी! राज्यातील २५ सरकारी विद्यालयांची नावे बदलली; तुमच्या परिसरातील शाळेचे नाव काय झाले? पाहा यादी

मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, बंगळूरु-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेन केएसआर बंगळूरुमधून रात्री १० वाजता निघेल, तर दुसऱ्या दिवशी दुपारी १:५० वाजता मुंबईच्या सीएसएमटी स्थानकात पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात एक्सप्रेस सीएसएमटी येथून रात्री १०:३० वाजता सुटून दुपारी २:५० वाजता बंगळूरुला पोहोचू शकते.

Vande Bharat Sleeper train update
दिवाळीआधीच तुकाराम मुंढेंचा धमाका, भेसळखोरांवर धडक कारवाई; कोट्यवधींचं तेल, भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त

नवीन वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसमुळे बंगळूरु आणि मुंबई या दोन शहरातील प्रवासाचा वेळ ६ ते ८ तासांनी कमी होणार आहे. या मार्गावर बऱ्याच काळापासून रात्रीच्या जलद रेल्वे प्रवासाचा पर्याय उपलब्ध नव्हता. दोन्ही शहरांना जोडणारी सध्या उद्यान एक्सप्रेस ही ट्रेन आहे, या ट्रेनने प्रवास पूर्ण करण्यासाठी अंदाजे २४ ते २५ तास लागतात. वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसमुळे प्रवासाचा वेळ १६ तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

अनंतपूर, गुंटकल, रायचूर, कलबुर्गी, सोलापूर, पुणे आणि कल्याण या स्थानकावर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस थांबणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, कर्नाटक विधान परिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने ऑक्टोबरमध्ये ही सेवा सुरू करता आली नाही.

Vande Bharat Sleeper train update
'डबल अटॅक'! हिवाळा ठरणार अत्यंत भयानक; अल नीनोच्या नव्या धोक्याने शास्त्रज्ञही चक्रावले, हवामानाचा धक्कादायक रिपोर्ट

ताशी १६० किमी वेगापर्यंतच्या धावण्यासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन डिझाइन केली आहे. चाचणीमध्ये ही ट्रेनचा वेग ताशी १८० किमी आहे. त्यामुळे या ट्रेनचा समावेश सेमी-हाय-स्पीड श्रेणीत होतो. भारतीय रेल्वेच्या नेटवर्कच्या बहुतांश भागात सध्या या वेगांवर ट्रेन चालवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. राजधानी एक्सप्रेस गाड्यांच्या तुलनेत नवीन ट्रेनचा प्रवास अधिक उत्कृष्ट आहे. याच्या डब्यांमध्ये युरोपियन गाड्यांपासून प्रेरित डिझाइन वैशिष्ट्ये आहेत. रात्रीचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी गादी असलेल्या बर्थचा समावेश आहे. प्रवाशांना सहज प्रवेश मिळावा यासाठी वरच्या बर्थची देखील पुनर्रचना करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रकारची आधुनिक बायो-व्हॅक्यूम शौचालये आहेत. तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी एक स्वतंत्र शौचालय आहे. एसी फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गरम पाण्यासह शॉवरची सुविधा उपलब्ध आहे. त्याशिवाय इतर अनेक सुविधाही या एक्सप्रेसमध्ये आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com