नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजप उमेदवार सुधाकर कोहळेंच्या पराभवाची राजकीय वर्तुळात चर्चा
कोहळेंच्या नावासमोर '१' ऐवजी '२' लिहिलेल्या सुमारे ४ हजार मतपत्रिका असल्याचा दावा
निवडणुकीत तब्बल १५ हजार मतं अवैध ठरल्याची माहिती चर्चेत
रोहित कदम, साम टीव्ही
नागपूर पदवीधर निवडणुकीच्या निकालाची चर्चा अद्याप कायम आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या पराभवावरून तर्कवितर्क लढवले जाताहेत. तर दुसरीकडे, स्वतः सुधाकर कोहळेंनीही मतांमध्ये फेरफार झाल्याचा दावा केलाय
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आला आणि भाजप उमेदवार सुधाकर कोहळेंचा गेम झाल्याची चर्चा रंगली. पहिल्या फेरीत सुधाकर कोहळे 927 मतांनी पिछाडीवर होते. कोहळेंच्या नावासमोर पहिली पसंती दर्शविण्यासाठी '1' लिहिण्याऐवजी काही मतदारांनी '2' हा आकडा लिहिला. अशा मतपत्रिकांची संख्या तब्बल ४ हजार निघाल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे, या निवडणुकीत तब्बल 15 हजार मतं अवैध ठरली. त्यामुळे कोहळेंविरोधात आपल्याच पक्षातील नाराजांनी रचलेलं कटकारस्थान तर नाही ना, अशीही कुजबुज भाजपच्या गोटात सुरू झालीय.
भाजपकडून मतदारांना कोहळेंना पहिली पसंती देण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र, या निवडणुकीचं गणित केवळ पहिल्या पसंतीपुरतं मर्यादित नसतं. मतदारांची दुसरी आणि तिसरी पसंतीही अंतिम निकालाच्या प्रक्रियेत महत्त्वाची ठरू शकते.
तर दुसरीकडे, भाजपच्या गोटातील काही जाणकारांनी पक्षाशी पूर्णतः सहमत नसलेल्या मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडून दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीची मते मिळविण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला दिला होता. मात्र, त्यांच्या या रणनीतीला अपेक्षित महत्त्व न दिल्याचंही बोललं जातंय या पार्श्वभूमीवर, पक्षांतर्गत संवाद आणि पक्षाच्या मायक्रोप्लॅनिंगवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.