Nagpur : नागपूरमध्ये गौरी विसर्जनादरम्यान भयंकर घडलं! आईसोबत तलावावर गेलेली २ मुले तलावात बुडाली

Nagpur News : नागपूरच्या झिल्पा येथे गौरी विसर्जनासाठी आईसोबत तलावावर गेलेल्या दक्ष धनराज लाड आणि आयुष हरिचंद कुंभारे या दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
Nagpur Gauri Visarjan Tragedy
Nagpur Gauri Visarjan TragedySaam tv
Published On
Summary
  • नागपूरच्या झिल्पा येथे गौरी विसर्जनादरम्यान हृदयद्रावक दुर्घटना

  • आईसोबत विसर्जनासाठी तलावावर गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

  • दोन्ही मुले अचानक तलावातील खोल पाण्यात गेल्याने दुर्घटना घडली

  • पोलीस पुढील तपास करत आहेत.

संदीप येवले, नागपूर

नागपूरमध्ये गणेशोत्सवावर विरजण पडलं आहे. गौरी विसर्जनासाठी आईसोबत तलावावर गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना झिल्पा येथे घडली. सणाच्या आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून, दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या दुर्घटनेत दक्ष धनराज लाड आणि आयुष हरिचंद कुंभारे यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरी विसर्जनाच्या निमित्ताने दोघेही आपल्या आईसोबत झिल्पा येथील तलावावर गेले होते. विसर्जनाची प्रक्रिया सुरू असताना दोघेही अचानक खोल पाण्यात गेले आणि पाण्यात बुडाले. घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दुर्घटनेत दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सणाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या मुलांवर काळाने अचानक घाला घातल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे.

Nagpur Gauri Visarjan Tragedy
Gauri Aagman : गणपतीच्या कोणत्या बाजूला गौराईची प्रतिष्ठापना करतात, उजव्या की डाव्या? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

दक्ष आणि आयुष यांच्या आकस्मिक निधनाची बातमी परिसरात पसरताच नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिचितांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मुलांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांचा आक्रोश पाहून मन हेलावून गेले. गौरी विसर्जनाच्या आनंदावर या दुर्घटनेने दुःखाचे सावट पसरले असून, झिल्पा परिसरातील वातावरण सुन्न झाले आहे.

Nagpur Gauri Visarjan Tragedy
UPI Payment : UPI पेमेंटवर आता शुल्क; २००० रुपयांच्या व्यवहारावर MDR लागू; कोणाला, किती अन् कधी लागू होणार? जाणून घ्या A टू Z माहिती

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे. पीआय रणजीत शिरसाट, हवालदार निलेश उईके, पोलीस शिपाई अमोल वाघ आणि एएसआय धनराज भुक्ते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सणासुदीच्या काळात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com