UPI Payment : UPI पेमेंटवर आता शुल्क; २००० रुपयांच्या व्यवहारावर MDR लागू; कोणाला, किती अन् कधी लागू होणार? जाणून घ्या A टू Z माहिती

UPI Payment New Update News : UPI च्या नव्या नियमांनुसार १५ ऑक्टोबर २०२६ पासून २,००० रुपयांपेक्षा जास्त व्यापारी व्यवहारांवर ०.४% MDR लागू होणार आहे. P2P व्यवहार मात्र मोफत राहणार आहेत.
UPI Payment Rules Change News
UPI Payment Rules Change News AI Image
Published On
Summary
  • १५ ऑक्टोबर २०२६पासून UPI संदर्भातील नवी MDR व्यवस्था लागू होणार

  • P2P UPI व्यवहार मोफत राहणार

  • २,००० रुपयांपेक्षा जास्त पात्र P2M व्यापारी व्यवहारांवर ०.४% MDR लागू होणार

  • २,००० रुपयांपर्यंतच्या छोट्या व्यापारी व्यवहारांना MDR मधून वगळण्यात आले

UPI वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी स्पष्ट केले की, UPI द्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवताना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. व्यवहाराची रक्कम कितीही असली तरी वैयक्तिक पेमेंट म्हणजेच P2P (Person-to-Person) व्यवहार पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे मोफत राहणार आहेत. असे असले तरी याचा फटका व्यवसायिकांच्या मोठ्या व्यवहारांवर होणार आहे.मंत्रालयाने स्पष्ट केल्यानुसार, हा नियम १५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहे. जाणून घ्या सविस्तर.

काय आहेत UPI चे नवे नियम?

राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या नव्या नियमांनुसार, २,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या व्यक्तीकडून व्यापाऱ्याला होणाऱ्या UPI पेमेंटवर ०.४टक्के MDR लागू केला जाणार आहे. मात्र, एका व्यवहारासाठी या शुल्काची कमाल मर्यादा ३०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाने २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केला आणि MDR ०.४ टक्के लागू झाला, तर २,००० रुपयांच्या रकमेवर ८ रुपये शुल्क होईल. हे शुल्क व्यापारी व्यवहारांना लागू होणार आहे. ग्राहकाकडून UPI वापरण्यासाठी थेट शुल्क आकारले जाणार नाही.

UPI Payment Rules Change News
Sleeping Position : डावी की उजवी कुशी? झोपण्याची कोणती पोझिशन आरोग्यसाठी आहे बेस्ट, जाणून घ्या

छोट्या व्यापाऱ्यांवर परिणाम होणार?

नव्या व्यवस्थेत २००० रुपयांपर्यंतच्या छोट्या व्यापारी व्यवहारांना MDR मधून वगळण्यात आले आहे. अशा व्यवहारांचा UPI मधील P2M (Person-to-Merchant) व्यवहारांमध्ये ९५ टक्क्यांहून अधिक वाटा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दैनंदिन किरकोळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर किंवा छोट्या व्यवहारांवर या बदलाचा थेट परिणाम होणार नाही. याशिवाय, P2PM अंतर्गत पात्र ठरणाऱ्या छोट्या विक्रेत्यांसाठी शून्य MDR चा हा नियम कायम राहणार आहे. UPI QR कोडद्वारे थेट बँक खात्यात दरमहा १ लाख रुपयांपर्यंत पेमेंट मिळवणारे छोटे विक्रेते यामध्ये येतील. रेल्वे, इलेक्ट्रॉनिक, विमा आणि इंधन यांसारख्या काही सेवांमध्ये २,००० रुपयांपेक्षा अधिक UPI व्यवहारांसाठी प्रति व्यवहार ५ रुपयांचे निश्चित MDR लागू करण्याची तरतूद आहे.

UPI Payment Rules Change News
Gauri Aagman : गणपतीच्या कोणत्या बाजूला गौराईची प्रतिष्ठापना करतात, उजव्या की डाव्या? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

डिजिटल पेमेंटचा विस्तार

दरम्यान, NPCI ने छोट्या व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र निधी उभारण्याचा प्रस्तावही मांडला आहे. शहरे आणि छोट्या बाजारपेठांमध्ये डिजिटल पेमेंटचा विस्तार, सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि नव्या तंत्रज्ञानातील गुंतवणुकीला या निधीतून मदत होण्याची अपेक्षा आहे. नव्या MDRचे प्रमाण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि डिजिटल वॉलेटसारख्या इतर डिजिटल पेमेंट माध्यमांच्या शुल्कापेक्षा कमी राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com