भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

Nagpur BJP MLA: नागपूरमध्ये भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना एसबीआयमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवणारा संशयास्पद फोन आला. आमदारांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
NAGPUR BREAKING: BJP MLA KRISHNA KHOPDE TARGETED IN SBI JOB FRAUD ATTEMPT
NAGPUR BREAKING: BJP MLA KRISHNA KHOPDE TARGETED IN SBI JOB FRAUD ATTEMPTsaam tv
Published On: 

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर: महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार सुरू असतानाच, आता चक्क एका आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवणारा संशयास्पद फोन आला. विशेष म्हणजे, फोन करणाऱ्याला आमदार असल्याची माहिती असतानाही, त्याने एका तासात तीन उमेदवारांची नावं पाठवण्यास सांगितल्याचा आमदारांचा दावा आहे.

NAGPUR BREAKING: BJP MLA KRISHNA KHOPDE TARGETED IN SBI JOB FRAUD ATTEMPT
Property News: अनधिकृत बांधकामांवर फडणवीस सरकारचा मोठा प्रहार; घेतला मोठा निर्णय, नियम मोडणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई

बँकेचा व्यवस्थापक असल्याची ओळख सांगत बँकेत तीन जागा रिक्त असल्याचं फोनवर सांगण्यात आलं. मात्र, फोन करणाऱ्याच्या नावातील विसंगतीमुळे आमदार खोपडे यांना संशय आला आणि त्यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. आता आमदारालाच फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची हिंमत वाढली असेल, तर सर्वसामान्य बेरोजगार तरुणांचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या फोनमागे नेमकं कोण आहे आणि बेरोजगार तरुणांना लक्ष्य करण्याचा हा प्रयत्न आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

NAGPUR BREAKING: BJP MLA KRISHNA KHOPDE TARGETED IN SBI JOB FRAUD ATTEMPT
Maharashtra Farmers Scheme : दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार १ लाख रुपये? जाणून घ्या सत्य

या प्रकरणाचा तपास करून संबंधितांना शोधून काढण्याची मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे. इतकंच नाही, तर निवृत्त नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईवरही सायबर फसवणूक करणारे डल्ला मारत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

NAGPUR BREAKING: BJP MLA KRISHNA KHOPDE TARGETED IN SBI JOB FRAUD ATTEMPT
Baramati News: 'सोमेश्वर' निवडणुकीत जय पवारांचा करिश्मा, २१ -० ने विजय; शरद पवार गटाचा दारूण पराभव

त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचं खोपडे यांनी सांगितलं तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारच्या निदर्शनासही हा विषय आणून देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com