

लावणीच्या कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे.
लावणीच्या नावाखाली कथित अश्लील हावभाव आणि नृत्य सादर केल्याचा आरोप
नागपंचमीसारख्या पारंपरिक उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्वरूपावरून प्रश्न
डिजेच्या तालावर अश्लील हावभाव करत हा बिभत्स डान्स यूपी- बिहारच्या निवडणुकीतली रॅली नाहीय़े. ना कुठला भोजपुरी कार्यक्रम. सुसंस्कृत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातला आहे. आणि या अश्लील डान्सला पार्श्वभूमी आहे. नागपंचमीच्या सणाची.त्याहून कळस म्हणजे नागपंचमी सणासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि जागतिक स्तरावर दखल घेतल्या गेलेल्य़ा बत्तीस शिराळ्यात हा सगळा प्रकार घडलाय. लावणीच्या नावाखाली हजारो गावकऱ्यांसमोर कसे अंगविक्षेप सुरु आहेत. नीट पाहा.
पारंपारिक लावणीच्या नावाखाली शिराळ्यात तरुणींनी केलेला आक्षेपार्ह डान्स आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत. त्यामुळेच नाद निराळा, बत्तीस शिराळा, असा हॅशटॉगही सध्या चर्चेत आलाय.व्यासपीठावर मागे पुढे बघ्यांची गर्दी आणि गर्दीच्या समोर सुरु असलेला हा अश्लील डान्स सणांची शोभा वाढवण्यासाठी आहे की बिभत्सपणाची हौस भागवण्यासाठी? असा प्रश्न निर्माण झालाय. नागपंचमीच नव्हे तर, दहीहंडी, गणेशोत्सव अशा महत्त्वांच्या सणांपासून महापुरुषांच्या आणि स्थानिक पुढाऱ्यांच्या जयंत्या, पुण्यतिथीलाही असेच प्रकार जागोजागी पाहायला मिळतात.
मुळात गावतल्या आजी- माजी आणि भावी पुढाऱ्यांकडून कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी अशा प्रकारच्या बिभत्स डान्सचं जाणीवपूर्वक आयोजन केलं जातं. लावणी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलेचा अलंकार आहे.मात्र, अलीकडच्या काळात लावणीच्या नावाखाली अश्लीलतेचा बाजार मांडलाय. हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का?.याआधी अनेक लावणी कलाकारांनी अशा आक्षेपार्ह डान्सला विरोध केलाय.
मात्र महाराष्ट्राच्या या लोककलेचा वारसा जपण्याची जबाबदारी केवळ कलाकारांचीच नाही, तर समाज आणि प्रशासनाचीही आहे. बत्तीश शिराळ्याची ही घटना महाराष्ट्राला लाज आणणारी आहे आणि धोक्याची घंटाही. वेळीच अशा अश्लील डान्सचं आयोजन करणाऱ्यांवर आणि डान्स करणाऱ्यांवर योग्य कारवाई केली नाही तर राज्यातील सण-उत्सावांचा बोऱ्या वाजल्याशिवाय राहणार नाही.
त्यामुळे शिराळ्यातल्या नागपंचमीसारख्या ३०० वर्षांची परंपरा असलेल्या सणात जाहीरपणे अश्लीलतेच्या मांडलेल्या बाजारकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. आणि सण- उत्सावाच्या नावाखाली परराज्याप्रमाणे या अश्लील डान्सला राज्यमान्यता मिळू नये, अन्यथा महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.