Housing Society Rules: हाउसिंग सोसायटीत नियम मोडला तर दंड कोणाला लागतो? घरमालक की भाडेकरू?

Bharat Jadhav

वाद का होतात?

सोसायट्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत वाजणारे डीजे, पार्किंगवरून शेजाऱ्यांमध्ये होणारे वाद, पसरलेला कचरा किंवा लिफ्ट आणि पार्किंगच्या जागा यांसारख्या गोष्टींवरून नेहमी वाद होत असतो.

सोसायटी नेहमी फ्लॅट मालकांवर दंड का लावते?

गृहनिर्माण संस्थेचे कायदेशीर संबंध केवळ मालमत्तेच्या नोंदणीकृत मालकाशी असतात, भाडेकरूशी नाही. त्यामुळे, सोसायटीच्या छोट्या-मोठ्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट फ्लॅट मालकाला दंड आकारला जात असतो.

भाडेकरूची चूक असेन तर?

मालमत्तेच्या नोंदणीकृत मालकाशी असतात, भाडेकरूशी नसते. त्यामुळे भाडेकरूची चूक असली तरीही, bylaws नुसार घरमालकच प्रामुख्याने जबाबदार असतो.

घरमालकाने काय घ्यावी काळजी?

सोसायटी व्यवस्थापन भाडेकरूला थेट ताकीद देऊ शकते, पण दंड हा मालकाकडून वसूल केला जातो. त्यामुळे घरमालकाने रेंट अग्रीमेंट किंवा लीव्ह-अँड-लायसन्स करारात स्पष्ट अटी नमूद करणे महत्त्वाचे असते.

कायदेशीर संरक्षण

रेंट अग्रीमेंटमध्ये हाऊसिंग सोसायटीचे नियम मोडल्यास आकारल्या जाणाऱ्या कोणत्याही दंडासाठी भाडेकरू जबाबदार असेन, असे स्पष्ट नमूद करावे. करारातील कलम घरमालकाला कायदेशीर संरक्षण देऊ शकते.

दंड कसा वसूल केला जाणार?

ही रक्कम एकतर भाडेकरूकडून स्वतंत्र वसूल केली जाऊ शकते किंवा सिक्युरिटी डिपॉझिटमधून वजा केली जाऊ शकते.

भाडेकरू करू शकतो आव्हान

वाचक मित्रांनो, सोसायटीकडून आकारला जाणारा प्रत्येक दंड वैध ठरत नसतो. सोसायटीचे bylaws आणि लागू कायदे दंडाचा आधार असतात. अवाजवी किंवा अयोग्य दंडाला उपलब्ध तक्रार किंवा अपील प्रक्रियेद्वारे आव्हान दिले जाऊ शकते.

हेही वाचा

येथे क्लिक करा

भाड्याच्या घरातील दुरुस्ती अन् रंगकामाचा खर्च कोण करणार, भाडेकरू की घरमालक?