Bharat Jadhav
या कायद्यात दुरुस्तीसाठी कोण जबाबदार असतो? भाडेकरू दुरुस्तीचा खर्च भाड्यातून कधी वजा करू शकतो का? निष्काळजीपणामुळे किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे भाड्याची मालमत्ता राहण्यायोग्य न राहिल्यास काय होते? याबाबत स्पष्ट तरतुदी नमूद आहेत.
भाडेकरू किंवा घरमालकाने नेहमी सर्व दुरुस्ती खर्च वाटून घ्यायच्या नसतात. तर दुरुस्तीच्या प्रकार, नुकसान सामान्य झीज-झडपामुळे झाले आहे की नाही यावर आणि भाडे कराराच्या अटींवर अवलंबून असतात.
दैनंदिन वापरामुळे होणारी सामान्य झीज सोडता रेंट अग्रीमेंटच्या सुरुवातीला मालमत्ता जशी होती, साधारणपणे त्याच स्थितीत दोन्ही पक्षांनी ठेवणे अपेक्षित असते. पण काही विशिष्ट दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांची जबाबदारी घरमालकावर असते. ही कामे भाडेकरारामध्ये नमूद केलेली असू शकतात.
सामान्य वापरामुळे कालांतराने घरातील भिंतींचा रंग फिका पडला किंवा खराब झाला असल्यास भाडे करार आणि लागू नियमांनुसार हा खर्च सामान्यतः घरमालकाच्या वाट्याला येऊ शकतो.
दैनंदिन दुरुस्तीची जबाबदारी भाडेकरारात नमूद असल्यास भाडेकरूला जबाबदारी उचलावी लागू शकते. पण मोठ्या किंवा अत्यावश्यक दुरुस्ती, जसे की इमारतीमधील किंवा मुख्य प्रणालींमधील बिघाड झाला असेल तर ही घरमालकाची जबाबदारी असते.
कालांतराने भिंतींचा रंग फिका पडणे, लहानसहान किंवा सामान्य झीज, मोठ्या दुरुस्तीची कामे,भाडे करारात घरमालकाला दिलेल्या दुरुस्तीच्या तरतुदीवरून मालकानं खर्च करायचा असतो.
भाडेकरार काळजीपूर्वक चेक करून दुरुस्तीशी संबंधित अटी तपासून घ्या. तुम्ही भाड्याच्या घराचा ताबा घेतल्यापासूनच्या वेळचे फोटो किंवा व्हिडिओ, दुरुस्तीची बिले आणि खर्चाचे कोटेशन्स जपून ठेवा.