

आधार कार्डधारकांना एक तोळा सोनं मोफत मिळणार असल्याचा दावा
या दाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओचा वापर करण्यात आलाय.
सरकारी योजनांबाबत माहिती मिळवताना अधिकृत सरकारी स्रोतांवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन
आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. आता ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना 1 तोळा सोनं मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय. पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ व्हायरल होतोय. पण, खरंच आधारकार्ड धारकांना एक तोळं सोनं सरकार देणार आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
हा व्हिडिओ पाहिलात. या व्हिडिओत मोदीच स्वत: घोषणा करत आहेत. त्यावेळी एक महिला आधारकार्डबद्दल दावा करतेय.पण, खरंच आधार कार्ड धारकांना 1 तोळा सोनं मिळणार आहे का? या दाव्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. कारण, प्रत्येकाकडे आधारकार्ड आहे. त्यामुळे या दाव्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.
हा व्हिडिओ मोदींच्या नावाने व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी योजनेबद्दल बोलत आहेत. या योजनेअंतर्गत, सरकार आधार कार्ड असलेल्या अर्जदारांना 1 तोळा सोने देणार आहे असा दावा करण्यात आलाय. पण, खरंच सर्व आधारकार्ड धारकांना 1 तोळा सोनं मिळणार आहे का? सध्या सोन्याची एक तोळा किंमत अंदाजे दीड लाख इतकी आहे. मग एवढं महागडं सोनं देण्याची अशी कोणती योजना आहे?
सगळ्यांसाठीच हा निर्णय घेण्यात आलाय का? हे खरं असेल तर एक तोळा सोन्यासाठी काय करावं लागेल? असे अनेक सवाल उपस्थित होतायत. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याबाबत अधिक माहिती जाणून घेतली.सरकारची अशी योजना आहे का? हे तपासून पाहिलं. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.
मोदींच्या नावाने व्हायरल होत असलेला व्हिडिओ बनावट
पंतप्रधान मोदींचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल
आधारकार्ड धारकांना 1 तोळा सोनं मिळणार नाही
पंतप्रधानांनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही
असे व्हिडिओ व्हायरल करून त्यासोबत लिंकही व्हायरल केली जाते. सध्या आधारकार्ड हे सगळ्यांकडेच असतं. त्यामुळे अनेकजण अशा अफवांवर विश्वास ठेवून लगेच अर्ज भरतात. पण, असे मेसेज पाहून अर्ज भरल्यास फसवणूक होऊ शकते. त्यामुळे असे मेसेज आणि व्हिडिओ आल्यास त्यापासून सावध राहा. केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नसून, आमच्या पडताळणीत आधारकार्डवर सरकार 1 तोळा सोनं मोफत देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.