आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय...नोंदणीवेळी मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषेचा पर्याय निवडल्यास नोंदच रद्द होईल असा दावा करण्यात आलाय...पण, व्हायरल मेसेजमध्ये जो दावा केलाय त्यात तथ्य आहे का...? हा मेसेज व्हायरल झाल्यामुळे संभ्रम निर्माण झालाय...पण, खरंच यात सत्यता आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...
जनगणनेच्या नोंदणीदरम्यान मराठी भाषिकांनी भाषेच्या रकान्यात फक्त मराठी असाच उल्लेख करावा. जर त्यांनी मराठीसोबत इतर कोणत्याही भाषेचा उल्लेख केला, तर त्यांची नोंद अमान्य ठरेल आणि यामुळे मराठी भाषिकांची अधिकृत संख्या कमी होईल.इतकेच नव्हे तर भाषिक लोकसंख्येच्या आधारावरच निधीचे वाटप होते.
...हा मेसेज व्हायरल होतोय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? जनगणनेच्या अर्जात इतर भाषेची नोंदणी केल्यास अर्ज अवैध ठरतो का...? त्याचा थेट परिणाम मराठी भाषिकांच्या संख्येवर आणि अर्थसंकल्पीय निधीच्या वाटपावर होतो का...? असे अनेक सवाल उपस्थित होतायत...त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत सरकारकडे माहिती मिळू शकते...आमच्या टीमने याबाबत सरकारकडून माहिती मिळवली...त्यावेळी त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं पाहुयात...
जनगणनेतील मराठी भाषेच्या नोंदीबाबतचा मेसेज खोटा
जनगणनेबाबतचा मेसेज दिशाभूल करणारा
अशा अफवांवर विश्वास ठेवू नका
जनगणनेशी संबंधित सर्व माहिती, नियम आणि प्रक्रियेची अचूक आणि अधिकृत माहिती मिळवण्यासाठी वेबसाईट आहे...censusindia.gov.in या साईटवर सर्व माहिती उपलब्ध आहे...आमच्या पडताळणीत जनगणनेत मराठी माणूस द्विभाषिक होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...सोशल मीडियावरून येणाऱ्या अपुऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता नागरिकांनी सतर्क राहावं...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.