

मुंबई ते शिर्डी वन डे ट्रीप प्लान
वंदे भारत ट्रेनची सर्व माहिती
वंदे भारत ट्रेनची वेळ, तिकीट
महाराष्ट्र ही देवदेवतांची भूमी आहे. अनेकजण देवदर्शनाला जातात. त्यात शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला रोज हजारो भक्त येतात. महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातूनदेखील भक्त येतात. दरम्यान, अनेकजण मुंबई-पुण्याहून एक दिवसाची शिर्डी ट्रीप प्लान करतात. परंतु अनेकदा कार किंवा बसने प्रवास करणे हे थकवा देणारे असते. कार किंवा बसने प्रवास करताना अनेकदा ट्राफिकदेखील लागते त्यामुळे पुढे वेळेचं गणित बिघडतं. परिणामी तुम्ही एक दिवसात परत मुंबई पुण्याला जाऊ शकत नाही. परंतु आता एका दिवसात तुम्ही मुंबई शिर्डी ट्रीप होणार आहे.
तुम्ही वंदे भारतने मुंबई ते शिर्डी प्रवास केला तर एका दिवसाची ट्रीप प्लान होऊ शकते. याचसोबत तुमचा प्रवास खूप आरामदायी असेल.वंदे भारत ट्रेनमध्ये तुम्हाला आराम करायला मिळेल. याचसोबत नाश्त्याचीही सोय असेल. तुम्ही अवघ्या काही तासात शिर्डीला पोहचाल.
शिर्डीची वन डे ट्रीप (Mumbai to Shirdi One Day Trip)
सर्वात आधी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सकाळी लवकरची वंदे भारत ट्रेन पकडायची आहे. ही ट्रेन तुम्हाला ९ वाजता नाशिकला सोडेल.यानंतर तुम्ही शिर्डीला जाऊ शकतात. याचसोबत दुसरादेखील एक मार्ग आहे.
सकाळी मुंबई ते शिर्डी वंदे भारत ट्रेन 22223 निघणार आहे. ही ट्रेन तुम्हाला साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशनवर ११.३० वाजता सोडेल.यानंतर तुम्हाला शिर्डीला जाऊन साईबांबाचे दर्शन घेता येईल. तुम्हाला जवळपास ५ तासांचा वेळ मिळणार आहे. यानंतर तुम्हाला संध्याकाळी शिर्डी ते मुंबई अशी 22224 ट्रेन असणार आहे. ह ट्रेन साईनगर शिर्डी स्टेशनवर ५.४५ ला निघेल. यानंतर मुंबईत १०.५० मिनिटांनी पोहचेल. अशी तुम्ही तुमची एका दिवसाची ट्रीप प्लान करु शकतात.
तुम्ही सकाळी साईनगर शिर्डी स्टेशनला पोहचल्यावर तुम्हाला टॅक्सीने पुढे मंदिरात जायचे आहे. यासाठी २०-३० रुपये मोजावे लागेल. याचसोबत स्थानकाबाहेर अनेक हॉटेल्स आहेत तुम्ही तिथे थोडे फ्रेश होऊ शकतात.
तिकीटाचे दर (Vande Bharat Ticket Fare Shirdi to Mumbai)
शिर्डी ते मुंबई या ट्रेनचे तिकीट १,१३० रुपये असणार आहे. यामध्ये तुम्हाला जेवणदेखील मिळणार आहे. याचसोबत नाश्त्यासाठी चहा, कॉफी आणि बिस्कीट असा स्नॅक्सदेखील दिला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.