Shreya Maskar
हिवाळ्यात हनिमून ट्रिप प्लान करत असाल तर कुफरी हे सुंदर ठिकाण आहे. तुम्ही येथे जोडीदार, मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत देखील जाऊ शकता.
हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यात कुफरी हे लोकप्रिय ठिकाण वसलेले आहे. हे ठिकाण हनिमूनसाठी बेस्ट लोकेशन आहे. तुमचा जोडीदार येथे येऊन खुश होईल.
हिमालयाच्या कुशीत वसलेले कुफरी हे हिवाळी पर्यटन आणि साहसी खेळांसाठी प्रसिद्ध आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान येथे खूप बर्फवृष्टी होते, ज्यामुळे स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि टोबोगनिंग यांसारख्या खेळांसाठी येथे पर्यटक गर्दी करतात.
कुफरीला 'शिमल्याचे हिवाळी नंदनवन' आणि 'हिवाळी क्रीडा राजधानी' असे म्हटले जाते. तुम्ही येथे फोटोशूटचा भन्नाट आनंद घेऊ शकता.
महासू पीक हे हिमाचल प्रदेशातील कुफरी येथील सर्वोच्च शिखर आहे. डेओदार आणि पाईनच्या घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. येथून हिमालयाचे विहंगम दृश्य दिसते, ज्यात स्वच्छ हवामानात केदारनाथ आणि बद्रीनाथ पर्वतरांगा स्पष्ट दिसतात.
हिमालयातील विविध प्राणी आणि पक्षी पाहण्यासाठी हिमाचल प्रदेशातील कुफरी (शिमला) येथील 'हिमालयन नॅचरल पार्क' हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे. येथे हिमनग, कस्तुरी मृग, हिम बिबट्या, तपकिरी अस्वल असे अनेक प्राणी पाहायला मिळतात.
कुफरी सह शिमलाभोवतीचा संपूर्ण प्रदेश एकेकाळी नेपाळ राज्याचा भाग होता. १८१४-१६ च्या अँग्लो-नेपाळी युद्धाानंतर (गोरखा युद्ध), १८१५ मध्ये झालेल्या सुगौली करारानुसार हा प्रदेश ब्रिटिश राजवटीला सोपवण्यात आला आणि नंतर तो ब्रिटिश साम्राज्यात सामील झाला.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.