Shreya Maskar
ओडिशा राज्यातील पुरी, खुर्दा आणि गंजम जिल्ह्यांत पसरलेले चिल्का सरोवर हे आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
चिल्का सरोवर हे हिवाळ्यात सायबेरिया, मध्य आशिया आणि रशियातून येणाऱ्या लाखो स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमुख आश्रयस्थान आहे.
नलाबन पक्षी अभयारण्य या भागात फ्लेमिंगो, पेलिकन आणि विविध प्रजातींचे विदेशी पक्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान मोठ्या संख्येने पाहायला मिळतात, ज्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनते.
चिल्का सरोवराजवळ बरकुल, रंभा आणि सातपाडा ही प्रमुख पर्यटन ठिकाणे आहेत, जी नौकाविहार, पक्षीनिरीक्षण आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत.
सातपाडा इरावडी डॉल्फिन पाहण्यासाठी आदर्श ठिकाण आहे. येथे तुम्ही सुंदर फोटोशूट करू शकता. सरोवराच्या काठावरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
चिल्का तलावाला भेट देण्यासाठी हिवाळा हे बेस्ट लोकेशन आहे. तुम्ही येथे जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता. सुंदर निवांत वेळ तुम्हाला येथे घालवता येईल.
चिल्का तलावाच्या मध्यभागी असलेल्या बेटावर वसलेले देवी कालिजाईचे मंदिर एक जागृत धार्मिक स्थळ आहे. बार्कुल किंवा बालुगाव येथून बोटीने येथे पोहोचता येते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.