Shreya Maskar
पांडवगड किल्ला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात आहे. पांडवगड किल्ला महाबळेश्वरच्या डोंगरांगांमध्ये स्थित एक ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे.
पांडवगड किल्ला कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील राजा भोज 2 याने बांधला. किल्ल्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
पांडवगड किल्ला ट्रेकर्ससाठी उत्तम ठिकाण आहे. तुम्ही वीकेंडला येथे ट्रिप प्लान करू शकता. वन डे ट्रेकिंगसाठी हे उत्तम ठिकाणे आहे.
पांडवगड किल्ल्यावर पठारावर पांडजाई देवीचे पुरातन मंदिर आहे. किल्ल्याच्या माथ्यावर हनुमान मंदिर आहे. येथे तुम्हाला शांत वातावरण अनुभवता येईल.
पांडवगड किल्ल्यावर तलाव आणि पाण्याची टाकी आहेत. मुख्य तलावांसह अनेक खडकात कोरलेली पाण्याची टाकी आढळतात.
पांडवगड किल्ल्याला हिवाळ्यात भेट द्या. येथे तुम्हाला थंड वातावरण अनुभवता येते. तसेच साताऱ्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत.
सातारा जिल्हा महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. जिथे कास पठार, महाबळेश्वर, पाचगणी, सज्जनगड आणि अजिंक्यतारा किल्ला ही प्रमुख आकर्षणे आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.