Shreya Maskar
पालघर जिल्ह्यातील मनोरजवळील अशेरीगड हा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य डोंगरी किल्ला आहे. सुमारे ८०० वर्षे जुना असलेला हा किल्ला शिळहार राजवंशाच्या काळात बांधला गेला.
अशेरीगड किल्ला पोर्तुगीज, मराठा आणि ब्रिटिश संघर्षाचा एक प्रमुख साक्षीदार आहे. हे इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण आहे.
अशेरीगड किल्ला ट्रेकिंगसाठी एक उत्तम लोकप्रिय गड आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात किल्ला हिरवाईने नटलेला असतो.
अशेरीगड किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यातून पेशवे काळात चिमाजी आप्पांच्या कोकण मोहिमेदरम्यान (फेब्रुवारी १७३९) मराठ्यांनी जिंकून घेतला होता. त्यानंतर १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.
अशेरीगड किल्ल्याच्या माथ्यावर 20 पेक्षा जास्त पाण्याची टाकी, 2 तलाव, देवीचे मंदिर, पोर्तुगीज कालीन तटबंदी, बुरूज आणि तोफांचे अवशेष पाहायला मिळतात.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अशेरीगड किल्ल्याला आवर्जून भेट द्या. तुम्ही येथे कुटुंबासोबत देखील येऊ शकता. काही साहसी करायचे असेल तर हे कमी धोक्याचे चांगले ठिकाण आहे.
पालघर स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने अशेरीगड किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊ शकता. तेथून ट्रेकिंगची वाट सुरू होते. अशेरीगड किल्ल्याची बुलंद तटबंदी, अवाढव्य आकारमुळे पर्यटकांना आकर्षित करतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.