Shreya Maskar
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात घनदाट जंगलात वसलेला टिपागड किल्ला हा एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य डोंगरी किल्ला आहे.
टिपागड किल्ला छत्तीसगड सीमेजवळ असलेला हा दुर्गम किल्ला आहे. हा किल्ला गोंड राजे पुरमशाह यांच्या अधिपत्याखाली होता.
टिपागड किल्ल्यावर आजही गढीचे अवशेष, तटबंदी आणि बारमाही पाण्याचा मोठा तलाव पाहायला मिळतो.
टिपागड किल्ल्यावरील तलावातून 'टिपागडी' नदीचा उगम होतो. येथील तलावात वर्षभर पाणी उपलब्ध राहते.
टिपागड किल्ल्यावर गुरुबाबा देवस्थान असून तो पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. येथे तुम्ही नक्की जा.
घनदाट जंगलात असलेला टिपागड किल्ला ट्रेकिंगसाठी एक उत्तम आणि साहसी पर्याय आहे. हा किल्ला उंच डोंगरावर वसलेला आहे. तुम्ही मित्रांसोबत येथे ट्रिप प्लान करा.
गडचिरोलीला गेल्यावर मार्कंडेश्वर मंदिर, चपराळा वन्यजीव अभयारण्य, भामरागडचा त्रिवेणी संगम, कमलापूर हत्ती कॅम्प या ठिकाणांना आवर्जून भेट द्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.