Shreya Maskar
हिवाळा म्हटले की, थंड वारा, हिल स्टेशन, हिरवागार निसर्ग अनुभवायला मिळतो. थंडीत आपण अनेक ठिकाणी पिकनिक प्लान करतो.
येणाऱ्या वीकेंडला लांब कुठे जायचे नसेल आणि तुम्ही मुंबई जवळ पिकनिक स्पॉट शोधत असाल तर कल्याण जवळील चिको डॅम बेस्ट लोकेशन आहे.
चिको डॅम हा कल्याणजवळ उल्हास नदीवर बांधलेला आहे. स्थानिक लोकांसाठी फिरण्यासाठी आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे.
चिको डॅमवरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. वन डे ट्रिपसाठी येथे नक्की जा. निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करा.
कल्याणच्या परिसरातील स्थानिक लोक येथे नियमित व्यायाम, जॉगिंग करण्यासाठी येतात. मित्रांसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
चिको डॅम जवळ दुर्गाडी किल्ला, लोणाड गुहा आणि कला तलाव ही सुंदर ठिकाणे आहेत. तलावाकाठी बसून तुम्ही निवांत वेळ घालवू शकता.
कल्याण किंवा बदलापूर स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने चिको डॅमला जाऊ शकता. संध्याकाळी येथे सुंदर वातावरण पाहायला मिळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.