मोठी बातमी! मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली; मनोज जरांगेंनी स्पष्टच शब्दात दिला इशारा, म्हणाले...

Manoj Jarange Patil: मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आंदोलन करण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील गेल्या 14 दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहेत.
MUMBAI POLICE DENY PERMISSION TO MANOJ JARANGE PATIL
MUMBAI POLICE DENY PERMISSION TO MANOJ JARANGE PATILsaam tv
Published On

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्याच्या एल्गार पुकारला असून सर्व मराठा समाजाला त्यांनी मुंबईकडे कूच करण्याचे आवाहन केले आहे. मात्र मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. गेल्या 14 दिवसांपासून अंतरवालीसराटीमध्ये त्यांचे उपोषण सुरू आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत अन्नाचा एक कण ही आपण घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ऐन गणेशोत्सवाच्या दरम्यान त्यांनी मुंबईला येण्याचे ठरवल्याने सरकारचे चांगलेच टेन्शन वाढले आहे. अशातच कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता पोलिसांनी मराठा समाजाला परवानगी नाकारली आहे.

परवानगी नाकारल्याची माहिती समोर आल्यानंतर जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. आम्ही संविधानाप्रमाणे चालतो. सरकारने कायदा पायदळी तुडवला तर न्यायालय न्याय देते. आम्ही सरकारच्या नियमांशी बांधील नाही. सरकारचे नियम आम्ही मानत नाही. द्वेषभावनेतून आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

MUMBAI POLICE DENY PERMISSION TO MANOJ JARANGE PATIL
१९ सप्टेंबरला जरांगेंचा मुंबईत मुक्काम, अंतरावलीतून या दिवशी निघणार; ५ शहरांतून जाणार मराठ्यांचा मोर्चा, वाचा A टू Z माहिती

मुंबईत आंदोलन करण्यासंदर्भात न्यायालयाने भूमिका स्पष्ट केली असताना आंदोलनाला परवानगी नाकारली जात असल्याचा दावा करत जरांगे यांनी सरकारवर टीका केली. यातून द्वेष उफाळून येत आहे. गेल्यावर्षी देखील गणेशोत्सव होता. तरीही आम्ही शांततेत आंदोलन केले. यंदाही गणेशोत्सवाची मिरवणूक ठरल्याप्रमाणे होईल. तरी आम्ही उपोषण करू, असे ते म्हणाले.

MUMBAI POLICE DENY PERMISSION TO MANOJ JARANGE PATIL
... तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद! मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा; शिंदें-फडणवीसांवर सर्वात गंभीर आरोप

दरम्यान, आंदोलनाच्या परवानगीसाठी कायदेशीर लढाई लढण्याची तयारीही जरांगे पाटील यांनी दर्शवली आहे. आमचे वकील आजपासून कामाला लागतील. पोलीस आयुक्तांकडे जायचे की आणखी काय करायचे, हे आता वकील ठरवतील अशी माहिती त्यांनी दिली. पोलिसांवरही जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केले. पोलीस निरीक्षकांनी कायदा पायाखाली तुडवला आहे. सोयीनुसार कायदा चालवता येणार नाही. राज्य अस्थिर करण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत असा आरोप त्यांनी केला. गेल्यावर्षी कायदा नव्हता का? आता नवीन कायदा चालवणारे झाले का? फडणवीस यांना न्यायदेवतेसह सगळ्यांचा अवमान करायचा आहे. राज्य दूषित करायचे आहे, असा घणाघातही जरांगे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com