Mumbai-Ahmedabad Highway: वाहन चालकांचा जीव धोक्यात; मुंबई-अहमदाबाद महामार्गाची झाली चाळण

Mumbai-Ahmedabad Highway Potholes: या मार्गावरून जाणारे वाहन चालक खड्यातून कसरत करत जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.
Mumbai-Ahmedabad Highway
Mumbai-Ahmedabad HighwaySaam TV
Published On: 

चेतन इंगळे

Mumbai-Ahmedabad Highway: पावसाळा सुरु होताच मुंबईची तुंबई होऊन रस्त्यांची चाळण झाल्याचं चित्र उभं राहतं. अशात आता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याची माहिती समोर आली आहे. खड्डे पडल्याने वाहन चालकांचा जीव धोक्यात आला आहे. या मार्गावरून जाणारे वाहन चालक खड्यातून कसरत करत जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.(Latest Marathi News)

याच मार्गावर खनिवडे येथे वाहनांकडून टोल वसूल केला जातो. मात्र सुविधेच्या नावाने बोंबाबोंब पाहायला मिळत आहे. एखाद्या वाहनाचा अपघात अथवा पेट लागल्यास अग्निशमन यंत्रणा रुग्णवाहिका क्रेन सुविधा उपलब्ध केली जात नाही. त्यामुळे नेमकी टोल वसुली कसली, खड्यांची की रस्त्याची असा सवाल वाहन चालक करत आहेत.

Mumbai-Ahmedabad Highway
Ahmednagar Crime News: किरकोळ वादातून पेट्रोल पंप मॅनेजरची निर्घृण हत्या; कोपरगाव तालुक्यात खळबळ

मुसळधार पावसामुळे वाहनांचा वेग मंदावला

मुंबई सकाळपासूनच पावसाने जोर धरला असून अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात देखील झाली आहे. शिवाय पहिल्याच पावसात पश्चिम द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाने जोर धरल्यामुळे दृश्य मानता कमी झाल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

परिणामी मुंबईचा पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहनांचा वेग मंदावला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे देखील पाहायला मिळत आहे. अंधेरी (Andheri) पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती मार्गापासून विलेपार्ले पूर्वेकडील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रस्त्यावर ही वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

Mumbai-Ahmedabad Highway
Solapur Accident News: भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; पतीच्या डोळ्यासमोरच पत्नीचा मृत्यू, हृदयद्रावक घटना!

यामुळे पश्चिम उपनगरातून मुंबई (Mumbai) शहरात कामावर जाण्यासाठी निघालेल्या नोकरदार वर्गाला वाहन कोंडीतच अडकून पडण्याची वेळ आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. मात्र पावसामुळे आणि रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमूळे ही वाहन कोंडी सुटण्यास काहीसा विलंब होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.