Solapur Accident News: भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; पतीच्या डोळ्यासमोरच पत्नीचा मृत्यू, हृदयद्रावक घटना!

Solapur Husband Wife Accident News: दुचाकीवरून जात असलेल्या पती-पत्नीला भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू, तर पती गंभीर जखमी झाला आहे.
Solapur Husband Wife Accident News
Solapur Husband Wife Accident NewsSaam TV
Published On

Solapur Husband Wife Accident News: सोलापूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. दुचाकीवरून जात असलेल्या पती-पत्नीला भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू, तर पती गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्देवी घटना सोलापूर (Solapur News) महामार्गावरील धुळखेडजवळ गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

Solapur Husband Wife Accident News
Jalgaon Police News: पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळलं, आषाढी एकादशीच्या दिवशीच पोलीस अधिकाऱ्यासह चालकाचा दुर्देवी अंत

आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi 2023)  दिवशीच पतीच्या नजरेसमोर पत्नीने प्राण सोडल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. जनाबाई कांतीलाल गुमतापूरे (वय ४८ वर्ष) असे अपघातात ठार झालेल्या पत्नीचे नाव आहे. या अपघातात कांतीलाल गुमतापूरे (वय ५५ वर्ष) जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशीच्या निमित्ताने कांतीलाल गुमतापूरे हे पत्नी जनाबाई गुमतापूरे यांच्यासोबत दुचाकीवरून कर्नाटकातील येळगी येथे गेले होते. तेथून सोलापूरच्या दिशेने येत असताना टाकळी ते धुळखेड दरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक (Accident News) दिली.

Solapur Husband Wife Accident News
Cabinet Expansion News: युती सरकारमध्ये मोठे फेरबदल होणार? या मंत्र्यांना डच्चू मिळणार! नव्या मंत्रिमंडळात कुणाला संधी?

ही धडकी इतकी भीषण होती, की यामध्ये जनाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. तर कांतीलाल हे बाजूला फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी (Police) जनाबाई यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून कांतीलाल यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कांतीलाल गुमतापूरे हे दक्षिण सोलापुर तालुक्यातील मनगोळी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आहेत. अपघातात त्यांच्या पत्नीचं निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com