Electricity Bill MSEDCL Power Supply News : महावितरणच्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता जर तुमचे वीज बिल थकले, तर वीज कापण्यासाठी महावितरणचा कोणताही कर्मचारी तुमच्या घरी येणार नाही. नव्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मुख्य सर्व्हरवरूनच तुमचा वीजपुरवठा स्वयंचलितपणे (ऑटोमॅटिक) बंद केला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी वेळेवर वीज बिल भरणे आता अधिक गरजेचे झाले आहे. MSEDCL, Electricity Bill, Power Supply Disconnection)
पण, यामध्ये ग्राहकांसाठी एक मोठा दिलासाही देण्यात आला आहे. बिल थकल्यामुळे वीज कापली गेली, तरी ग्राहकाने ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने थकीत रक्कम भरल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांच्या आत वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत केला जाईल. थकीत बिलांची वसुली वेगाने करण्यासाठी आणि कारभारात शिस्त आणण्यासाठी महावितरणने ही नवी प्रणाली लागू केली आहे. महावितरणाच्या या निर्णायामुळे ग्रामीण भागातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
वीज बिल भरण्याची तारीख चुकली तर आता कर्मचारी नाही, थेट सर्व्हरवरून लाईट कट होणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना वेळेवर वीज बिल भरावेच लागेल. नाहीतर घरात अचानक अंधार होऊ शकतो. नवीन प्रक्रियेमुळे आता वायरमन अथवा कर्मचाऱ्यांवर अवलंबून न राहता थेट डिजिटल माध्यामातून कारवाई केली जाणार आहे. थकीत बिल भरल्यानंतर अर्ध्या तासात वीज सुरू होणार आहे.
ग्राहकांना अचानक अंधारात राहावे लागू नये, म्हणून मुदत संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ९ नंतरच ही स्वयंचलित कारवाई केली जाणार आहे. मात्र, ग्रामीण भागात अनेक नागरिक अजूनही कागदी बिलांवर अवलंबून असल्यामुळे, या डिजिटल सिस्टीममुळे मोठा गोंधळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.