Pune : केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला कट मारला, पुण्यात ३२ वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा

Murlidhar Mohol convoy : पुण्यातील संचेती चौकात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला दुचाकीने कट मारल्याने गुन्हा दाखल, तर दगडूशेठ मंदिराजवळ ताफ्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीने नागरिक संतापले.
Murlidhar Mohol convoy
Murlidhar Mohol convoy साम टीव्ही मराठी
Published On

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला एका दुचाकीने कट मारल्याची घटना पुण्यातील संचेती चौकात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर बेदरकारपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या कार्यक्रमादरम्यान मंत्र्यांचा ताफा गर्दीत अडकल्यामुळे स्थानिक नागरिक आणि भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नेमकी काय घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबरच्या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा ताफा संचेती चौकातून जात होता. त्यावेळी त्यांच्या अंगरक्षक कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक ईश्वर भिकुले यांच्या तक्रारीनुसार, शुभम विजय वनित (वय ३२, रा. नानापेठ) या दुचाकीस्वाराने ताफ्यातील वाहनाला वेडीवाकडी गाडी चालवून कट मारला. मानवी जिवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालवल्यामुळे १४ सप्टेंबर रोजी शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २८१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काठे करत आहेत.

Murlidhar Mohol convoy
RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

दगडूशेठ गणपती मंदिराजवळ भाविकांचा संताप

दुसरीकडे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विद्युत रोषणाईच्या उद्घाटनासाठी मंत्री मुरलीधर मोहोळ आले होते. त्यादरम्यान मध्यवर्ती भागातील गर्दीत त्यांच्या ताफ्यातील चार गाड्या अडकून पडल्या. आधीच नागरिकांची आणि भाविकांची मोठी गर्दी असताना मंत्र्यांच्या ताफ्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आणि सामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

"एवढ्या गर्दीच्या ठिकाणी मंत्र्यांनी गाड्यांचा ताफा आणायची काय गरज होती?" असा सवाल करत उपस्थित नागरिकांनी आणि भाविकांनी घटनास्थळी तीव्र संताप व्यक्त केला.

Murlidhar Mohol convoy
Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

या संपूर्ण प्रकारानंतर पुण्यात आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे स्वतःच्या गाडीला ओव्हरटेक करणाऱ्या किंवा कट मारणाऱ्या सामान्य नागरिकावर पोलीस तातडीने गुन्हा दाखल करतात, तर दुसरीकडे मंत्र्यांच्या ताफ्यामुळे शेकडो भाविकांना आणि नागरिकांना झालेल्या त्रासाला जबाबदार कोण? असा सवाल आता जनता विचारत आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी साम टीव्हीने मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मुरलीधर मोहोळ यांच्याशीही संपर्क केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यांची बाजू समोर आल्यानंतर ती स्पष्ट केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com