२५, ३० की ४०... घर खरेदी करण्याचं योग्य वय कोणतं? जाणून घ्या प्रॉपर्टी घेण्याची परफेक्ट वेळ

Best age to buy a house : २५, ३० की ४० व्या वर्षी घर खरेदी करावं? जाणून घ्या घर घेण्याची योग्य वेळ, होम लोनचा ईएमआय, डाउन पेमेंट, बचत, भाड्याचं घर आणि आर्थिक नियोजनाचे महत्त्वाचे मुद्दे.
Best age to buy a house
Best age to buy a housesaam tv marathi
Published On

Home Loan EMI : स्वतःचं हक्काचं घर असावं, असं प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. पण घर खरेदी करणं हा फक्त एक भावनिक निर्णय नाही तर तो एक मोठा आर्थिक निर्णय असतो. अनेकदा लोक घर कधी खरेदी करावं? वयाच्या विसाव्या वर्षी, तिसाव्या वर्षी की चाळीशीत..याबाबत गोंधळात असतात. योग्य वयात आणि योग्य वेळी घर खरेदी केल्यास होम लोन फेडणं सोपं जातं, तर चुकीच्या वेळी घेतलेला निर्णय आयुष्याभर आर्थिक तणाव देऊ शकतो.

घर खरेदी करण्यासाठी नक्की कोणतं वय सर्वात योग्य मानलं जातं, चाळीशीनंतर होम लोन घेताना कोणत्या अडचणी येतात आणि वयानुसार तुमचे आर्थिक नियोजन कसे असावे, याचा सविस्तर आढावा रिअल इस्टेट तज्ज्ञांनी दिला आहे.

२५ ते ३० वर्षे....

करिअरच्या सुरुवातीला पगार वाढण्याची संधी जास्त असते. पण त्याच वेळी बचत कमी असते आणि नोकरीतही पूर्ण स्थिरता आलेली नसते. त्यासोबतच शैक्षणिक कर्ज, कुटुंबाची जबाबदारी किंवा नोकरी बदलणे यांसारख्या गोष्टींचाही सामना करावा लागतो. या वयात घर घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला जास्त वर्षांसाठी होम लोन मिळते. त्यामुळे दर महिन्याचा हप्ता (EMI) कमी होतो. पण याचा एक तोटाही आहे. घराच्या डाउन पेमेंटमध्येच मोठी रक्कम निघून गेल्यामुळे इतर ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे खूप कमी पैसे उरतात. त्यामुळे वयाच्या ३० वर्षाच्या आत घर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी डाउन पेमेंट व्यतिरिक्त आपत्कालीन खर्चासाठी (Emergency Fund) आणि इतर भविष्यातील कामांसाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे आहेत की नाही, हे नक्की तपासून पाहा.

Best age to buy a house
Housing Society Rule : सोसायटीच्या शेजारी दारूचे दुकान? महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; पाहा काय आहे नवीन नियम

३० ते ४० वर्षे....

वयाच्या तिशीनंतर प्रत्येकाच्या करिअरची दिशा अधिक स्पष्ट होते. उत्पन्न पूर्वीपेक्षा अधिक स्थिर होऊ शकते आणि कुटुंब, मुलांचे शिक्षण व भविष्यातील गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात. हा तो टप्पा आहे जेव्हा अनेकांसाठी घर खरेदी करणे व्यावहारिक ठरते. पण वाढलेल्या उत्पन्नाच्या आधारावर महागडे घर खरेदी करणे ही योग्य रणनीती नाही.

उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न चांगले असेल. पण घराचे हप्ते भरल्यानंतर गुंतवणूक, मुलांचे शिक्षण, विमा आणि दैनंदिन खर्चासाठी खूपच कमी पैसे शिल्लक राहतात. तर महागडी मालमत्ता खरेदी केल्याने भविष्यात तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे घर खरेदी करण्याआधी सर्व गोष्टी तपासून घ्या.

Best age to buy a house
Maintenance Rules : सोसायटीचा मेंटेनन्स बुडवताय? मग थेट तुमचा फ्लॅट, गाडी आणि टीव्ही जप्त होणार, पाहा नियम

४० वर्षानंतर

वयाच्या चाळीशीत किंवा त्यानंतर घर खरेदी करणे हा एक पूर्णपणे व्यवहार्य निर्णय आहे. या वयात अनेक लोकांचे उत्पन्न आणि बचत चांगली असते. यामुळे त्यांना दीर्घकाळासाठी कोणत्या शहरात राहायचे आहे आणि आपल्या कुटुंबासाठी कोणत्या प्रकारची मालमत्ता हवी आहे, याची अधिक स्पष्ट कल्पना येते. ४० नंतर गृहकर्जाचा कालावधी कमी असू शकतो, हा महत्त्वाचा भाग आहे. कमी कालावधीचा अर्थ अनेकदा जास्त मासिक हप्ता असा होतो. त्यामुळे चाळीशीनंतर घर खरेदी करणाऱ्यांनी आपल्या कर्जाचा बोजा नियंत्रणात ठेवण्यासोबतच निवृत्तिनंतरचा पैसा बाजूला ठेवण्याची तयारी करावी.

Best age to buy a house
Housing Society : सोसायटीने गणेशोत्सवाच्या वर्गणीसाठी सक्ती केली? आताच जाणून घ्या तुमचे कायदेशीर अधिकार

रेंटरवर राहात असाल तर..

तुम्ही भाड्याच्या घरात राहात असाल, प्रत्येक महिन्याला रेंट देत असाल म्हणून घर खरेदी केलेच पाहिजे, असे नाही. भाड्याने राहणे म्हणजे पैशांची उधळपट्टी हे चुकीचं आहे. तुम्ही नोकरी, शहर किंवा करिअर बदलण्याच्या विचारात असाल, तर भाड्याच्या घरात राहणे अधिक सोयीचे आणि फायदेशीर ठरते.

घर खरेदी करताना फक्त 'डाउन पेमेंट' आणि 'ईएमआय' (EMI) एवढाच खर्च नसतो. तर नोंदणी शुल्क (Registration), स्टॅम्प ड्युटी, कर, घराची देखभाल आणि दुरुस्ती यांसारख्या इतर अनेक खर्चांचा मोठा बोजा पडतो. पण, जर तुम्ही एखाद्या शहरात कायमस्वरूपी स्थायिक होणार असाल आणि तुमचे उत्पन्न व बचत चांगली होत असेल. तु्म्ही सर्व खर्च जाऊन आणि सेव्हिंग करून ईएमआय सहज भरू शकता, तर स्वतःचे घर घ्यायचा विचार करा.

Best age to buy a house
Pune : केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला कट मारला, पुण्यात ३२ वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा

होमलोन घेण्यापूर्वी हा विचार नक्की करा..

घर विकत घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या दरमहा येणाऱ्या उत्पन्नाचा आणि होणाऱ्या खर्चाचा अचूक अंदाज घ्या. त्यानंतर घराचे 'डाउन पेमेंट' भरल्यानंतर तुमच्याकडे किती बचत शिल्लक राहते, याचा हिशोब करा. गृहकर्जाचा हप्ता (EMI) इतका मोठा नसावा की ज्यामुळे तुमच्या मासिक पगाराचा मोठा भाग त्यातच निघून जाईल. तज्ज्ञांच्या मते, ईएमआयचा तुमच्या रोजच्या आर्थिक बजेटवर अतिरिक्त ताण पडता कामा नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com