Monsoon Update: राज्यासाठी पुढचे ४ ते ५ दिवस महत्वाचे, पाऊस धुमाकूळ घालणार; 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

Maharashtra Rainfall: राज्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे.
Monsoon Update: राज्यासाठी पुढचे ४ ते ५ दिवस महत्वाचे, पाऊस धुमाकूळ घालणार; 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट
MAHARASHTRA WEATHER UPDATESaam Tv
Published On
  • महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला

  • पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

  • अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला

  • २४ ते २६ जूनदरम्यान पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याची शक्यता

सचिन जाधव, पुणे

मान्सूनबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. मान्सून राज्यात दाखल होऊन २० दिवस झाले. आता हळूहळू मान्सून राज्यात सक्रीय झाला असून राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पाऊस धुमाकूळ घालत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला तर दुसरीकडे शेतकरी देखील सुखावला. आता शेतीच्या कामाला वेग येणार आहे. अशातच हवामान खात्याने महत्वाची अपडेट दिली आहे. पुढचे चार ते पाच दिवस राज्यासाठी महत्वाचे असणार आहे. या दिवसांत राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान तज्ज्ञ एस डी सानप यांनी सांगितले की, 'संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. येणारे चार ते पाच दिवस पावसाचे असणार आहे. गेल्या आठवड्यात ढग निर्मिती नव्हती. मात्र आता कोकण किनारपट्टी, महाराष्ट्रातील बहुतांश भागात ढग निर्मिती झाल्याने पाऊस होतं आहे. मान्सून राज्यात सक्रिय झाल्याने वाऱ्याचा वेग वाढल्याने ढग निर्मिती होऊन पाऊस पडत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला गेला आहे. पुढे मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये मान्सून पोहचला आहे.'

तसंच, 'राज्यात काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. येणाऱ्या पाच दिवसांत अनेक ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. एल निनो स्ट्राँग असेल तर सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. मान्सून राज्यात यायला यंदा ७ ते ८ दिवस उशिर झाला. जूनच्या पावसात गेले दोन दिवसांत ७२ टक्के तूट पडली. जून महिन्यात झालेली तूट येणाऱ्या पाच दिवसांत भरून येईल.', असे सानप यांनी सांगितले.

तर दुसरीकडे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील हवामानाचा महत्वाचा अंदाज वर्तवला आहे. १० जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर पाहायला मिळेल. हळूहळू पावसाचा जोर वाढत जाईल. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, बीड, परभणी, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, भंडारा, वर्धा, नागूपर, यवतमाळ या ठिकाणी पावसाचा जोर राहिल. २४ ते २६ जूनदरम्यान राज्यात पावसाचा जोर अधिक राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com