Vidarbha Monsoon : अखेर विदर्भात मान्सून दाखल, पण 'या' तारखेपर्यंत पेरणी करूच नका; हवामान विभागाचा शेतकऱ्यांना मोठा इशारा

Maharashtra Monsoon Update : अखेर विदर्भात मान्सून दाखल झाला असून हवामान विभागाने शेतकऱ्यांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. ७० ते १०० मिमी पाऊस पडेपर्यंत पेरणीची घाई करू नका, अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.
monsoon news
monsoon news saam tv
Published On

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून चातकासारखी वाट पाहायला लावणाऱ्या मान्सूनचे अखेर विदर्भात आगमन झाले आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळालाय. तर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, हवामान विभागाने शेतकऱ्यांना पेरणीबाबत एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

विदर्भात मान्सून १० दिवस उशिराने; 'या' जिल्ह्यांत हजेरी

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा विदर्भात मान्सून पोहोचायला सुमारे १० दिवसांचा विलंब झाला आहे. अखेर मान्सून विदर्भात दाखल झाला असला, तरी त्याने अजून पूर्ण विदर्भ व्यापलेला नाही. सध्या विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मान्सूनने हजेरी लावली आहे. पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून उर्वरित विदर्भही व्यापेल. तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया या भागातही पुढील काही दिवसांत मान्सून दाखल होईल.

monsoon news
Maharashtra Politics: भास्कर जाधवांचा सूचक WhatsApp स्टेटस, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई करू नका

हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. मान्सून दाखल झाला असला, तरी सुरुवातीला पावसामध्ये काही दिवसांचा खंड पडू शकतो. २८ जूननंतर मान्सूनचा दुसरा टप्पा सक्रिय होईल. त्यामुळे जोपर्यंत शेतात किमान ७० ते १०० मिमी पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करू नये; अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.

monsoon news
उद्धव ठाकरेंना बसणार दुसरा मोठा धक्का; मुंबई महापालिकेत ऑपरेशन टायगर? VIDEO

नाशिकमध्ये यलो अलर्ट; तापमानात घट

दुसरीकडे, नाशिक शहर आणि ग्रामीण भागातही मॉन्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनामुळे नाशिकमधील कमाल तापमानात मोठी घट झाली असून वातावरण आल्हाददायक झाले आहे. हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्याला पावसाचा 'यलो अलर्ट' दिला असून, घाटमाथा परिसरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नाशिककर सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा करत असून शेतकरी वर्ग सुखावला आहे.

monsoon news
Modi Cabinet Expansion: मोठी बातमी! मोदी सरकार 12 मंत्र्यांना घरी बसवणार; मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

राज्याची स्थिती काय?

सध्या महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बराचसा भाग, तसेच मुंबई आणि पुणे हा परिसर मान्सूनने व्यापला आहे. पुढील ६ ते ७ दिवस पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस राहील, तर पूर्व आणि पश्चिम विदर्भात सामान्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

monsoon news
Rule Change : रेल्वे तिकीट ते LPG, १ जुलैपासून बदलणार 7 नियम; थेट तुमच्या खिशावर परिणाम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com