Rule Change : रेल्वे तिकीट ते LPG, १ जुलैपासून बदलणार 7 नियम; थेट तुमच्या खिशावर परिणाम

July 1 Rule Changes: 1 जुलै २०२६ पासून आधार अपडेट, रेल्वे दंड, एलपीजी सिलेंडर दर, तसेच अनेक नियमांमध्ये बदल होणार असून त्याचा सर्वसामान्यांच्या खर्चावर परिणाम होऊ शकतो.
July 1 Rule Changes
July 1 Rule Changes google
Published On

जून महिना संपायला काहीच दिवस शिल्लक राहीले आहेत. तर येणाऱ्या महिन्यात रेल्वेच्या तिकीटांपासून ते LPG गॅस सिलेंडरच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. १ जुलैपासून होणाऱ्या नियमांच्या बदलांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

नोकरी करणारे कर्मचारी, पेन्शनधारक, करदाते आणि बँकांच्या ग्राहकांपर्यंत कोटींहून अधिक लोकांना हा बदल जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण या नियमांमुळे तुमच्या खर्चावर परिणाम होऊ शकतो. यातले काही नियम हे बँकिंग आणि आर्थिक योजनांशी संबंधित असणार आहेत. पुढील माहितीत हे महत्वाचे ७ नियम जाणून घेऊयात.

July 1 Rule Changes
8th Pay Commission: कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार, बेसिक सॅलरी ₹69940 होणार?

१ जुलैपासून बदलणार पुढील ७ नियम

१. आधार कार्ड ई-मेल अपडेट (aadhar card new rules)

१ जुलै २०२६ ते डिसेंबर २०२६ दरम्यान आधार मोबाईल अॅपच्या मदतीने ई-मेल आयडी अपडेट केल्याने ७५ रुपयांचे शुल्क आकारले जाणार नाही. युआयडीएआयने नागरिकांना आधार कार्डाची माहिती अपडेट करण्याची सवलत दिली आहे.

२.रेल्वेने विनातिकीट प्रवासाचा दंड वाढणार (Indian Railways New Rule )

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवरचा दंड आधी २५० रुपये होता. आता हा दुप्पट म्हणजे 500 रुपये करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास, महिलांच्या राखीव डब्यात प्रवेश आणि रेल्वेत गैरवर्तन करणाऱ्यांवरही कडक कारवाई होऊ शकते.

३. एफडीच्या व्याजदर आणि नियमांमध्ये बदल (FD interest rates New rules)

जुलैपासून काही बँका मुदत ठेवींवरील म्हणजेच FD वरील व्याजाच्या दरात आणि संबंधित नियमांमध्ये बदल करू शकतात. नवीन गुंतवणूक किंवा एफडी रिन्युअल करण्याआधी ग्राहकांनी ताजे दर तपासणं फायदेशीर ठरेल.

४. एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल (LPG cylinder New Rule)

आंतरराष्ट्रीय बाजारातल्या परिस्थितीवर अवलंबून जुलै महिन्याच एलपीजी सिलेंडरच्या किंमतींमध्ये बदल होऊ शकतात. याआधीही घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.

५. एसबीआय क्रेडिट कार्ड रिवॉर्ड नियम बदलणार (SBI credit card )

PhonePe SBI Credit Card PURPLE आणि SELECT BLACK कार्ड तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्स कमावण्याची मर्यादा लागू होणार आहे. काही व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नसल्यामुळे ग्राहकांनी नवीन नियम जाणून घेणं गरजेचं आहे.

६. पेट्रोल-डिझेल दरांमध्ये बदल (Petrol-Diesel New Rule)

कच्च्या तेलाच्या जागतिक किंमतींमधल्या चढ-उतारामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे नवीन महिन्याच्या सुरुवातीला इंधन दरांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

७. एटीएफ (ATF) इंधन शुल्कात बदल ( ATF fuel charges New Rule)

एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (ATF) आणि डिझेल निर्यातीवरील शुल्कात वाढ केल्यानंतर सरकार पुन्हा दरांचा आढावा घेऊ शकते. आंतरराष्ट्रीय तेल बाजारातल्या स्थितीनुसार जुलैमध्ये एटीएफच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे.

July 1 Rule Changes
Income Tax Return: करदात्यांसाठी मोठी बातमी! ITR भरला पण हे काम विसरलात? लगेचच पूर्ण करा प्रोसेस, शेवटची तारिख आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com