Modi Cabinet Expansion: मोठी बातमी! मोदी सरकार 12 मंत्र्यांना घरी बसवणार; मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

Modi Government Big Cabinet Expansion: भाजप पहिल्यांदाच भाजप युवा मोर्चातील एका मंत्र्यालाही स्थान मिळण्याची शक्यता आहे. १५ ते १८ जून दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
Modi Government Big Cabinet Expansion:
Modi government is likely to undertake a major cabinet expansionsaam tv
Published On
Summary
  • मोदी सरकारचा मोठा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता.

  • सुमारे १२ विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता.

  • आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन फेरबदल केला जाणार

देशातील राजकीय आणि सत्ता वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रातील मोदी सरकार आगामी राज्य विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. या निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मोठ्या मंत्रिमंडळ विस्ताराची आणि फेरबदल करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनुसार, मोदी मंत्रिमंडळ विस्तार जून महिन्याच्या मध्यापर्यंत होण्याची शक्यता आहे.

Modi Government Big Cabinet Expansion:
BJP Reshuffle: भाजपमध्ये मोठा फेरबदल, थेट ४ राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले

हा फेरबदल केवळ प्रशासकीय सुसूत्रतेसाठीच नव्हे, तर आगामी राज्य विधानसभा निवडणुका आणि मित्रपक्षांसोबत राजकीय संतुलन राखण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. या संभाव्य विस्तारामुळे १२ विद्यमान मंत्र्यांच्या बडतर्फीपासून ते नवीन, तरुण चेहऱ्यांना संधी देण्यापर्यंत अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले जाऊ शकतात.

१२ मंत्र्यांना हटवले जाण्याची शक्यता

सूत्रांनुसार, या मंत्रिमंडळ फेरबदलात सध्याच्या मंत्रिमंडळातून अंदाजे १२ मंत्र्यांना बाहेर केलं जाण्याची शक्यता आहे. यासाठी दोन मुख्य कारणे सांगितले जात आहेत. पहिले, मंत्र्यांची खराब कामगिरी आणि दुसरे, पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी काही ज्येष्ठ नेत्यांना पक्षात परत आणण्याची गरज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नियमितपणे आपल्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेत आहेत. ज्या मंत्रालयांमध्ये काम संथपणे चालत आहे, तिथे नवीन आणि उत्साही चेहऱ्यांची नियुक्ती केली जाईल, असा विश्वास आहे.

जेडीयूला अधिक जागा मिळण्याची शक्यता

या मंत्रिमंडळ विस्ताराचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) च्या मित्रपक्षांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. बिहारमधील आगामी राजकीय घडामोडी आणि जेडीयूच्या मागण्या पाहता, नितीश कुमार यांच्या पक्षाला यावेळी मोदी मंत्रिमंडळात मोठा वाटा मिळण्याची शक्यता आहे. जेडीयूला एक किंवा दोन नवीन मंत्रीपदे किंवा महत्त्वाची खाती मिळू शकतात, ज्यामुळे बिहारमधील एनडीए आघाडी आणखी मजबूत होईल.

Modi Government Big Cabinet Expansion:
महाराष्ट्र ते दिल्ली, काँग्रेसमध्ये होणार मोठा फेरबदल; थेट ७ राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार

भाजप युवा मोर्चातून मंत्र्यांची नियुक्ती होणार!

या मंत्रिमंडळ फेरबदलातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच भारतीय जनता युवा मोर्चाच्या (BJYM) सर्वोच्च नेतृत्वाला किंवा तळागाळातील युवा नेत्यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याचा विचार केला जातोय. दरम्यान भाजप नेहमीच तरुणांच्या प्रगतीचे समर्थन करत असते.

परंतु युवा मोर्चाच्या कोट्यातून थेट केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश करून पंतप्रधान मोदींना एक मोठा राजकीय संदेश दिला जाणार आहे. देशातील तरुण मतदारांना आकर्षित करणे आणि पक्षातच दुसऱ्या फळीतील नेतृत्व विकसित करण्याचा उद्देश या निर्णयामागील असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com