- विनायक वंजारे
पोलिसांना सोबत घेऊन कोणी खंडणी मागायला जातो का? असा सवाल करत राजकीय दबावापोटी माझ्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. आज दुपार पर्यंत मला न्याय मिळेल, आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत माध्यमांशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
ठाणे येथील मनसे अध्यक्ष अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावर 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन (shailesh jain) यांच्या तक्रारीवरून जाधव आणि ठक्कर यांच्यावर खंडणी, मारहाण व कट रचल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान मनसे नेते अविनाश जाधव यांनी त्यांच्यावर झालेल्या आराेपाचे खंडण केले. ते म्हणाले पोलिसांना सोबत घेऊन कोणी खंडणी मागायला जातो का? राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल झाला आहे. आम्हांला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला दुपार पर्यँत न्याय मिळेल. ज्या व्यापाऱ्याच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल केला गेला. त्याच व्यापाऱ्यावर देखील अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याचा दावा मनसे जाधव यांनी केला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.