Baramati Lok Sabha Election: बारामती लोकसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी उदंड प्रतिसाद, 228 मतदारांनी बजावला हक्क

मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम पाहणारे अधिकारी व कर्मचारी यांचे मतदान केंद्रावरील मतदानाच्या दिवशी करावयाच्या कामकाजाबाबतचे दुसरे प्रशिक्षण व ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनची हाताळणी याचे प्रशिक्षण झाले.
228 voters cast their vote in home baramati lok sabha election
228 voters cast their vote in home baramati lok sabha election Saam Digital

- सचिन जाधव

Baramati Lok Sabha Constituency Voting :

बारामती लोकसभा मतदारसंघात येत्या सात मे राेजी मतदान हाेणार आहे. यंदा आयोगाने प्रथमच गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ मतदारसंघातील 228 मतदारांनी घेतला असून त्यांनी मताधिकार बजावल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती,इंदापूर, दौंड आणि भोर या चार विधानसभा मतदारसंघात प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या घरी जाऊन त्यांचे नुकतेच मतदान करून घेतले. या चार विधानसभा मतदारसंघात 284 मतदारांनी पूर्वनोंदणी केली हाेती.

228 voters cast their vote in home baramati lok sabha election
Abhijeet Patil: माढ्यात माेठ्या राजकीय घडमाेडी, विठ्ठल कारखान्यावरील जप्ती मागे; अभिजीत पाटील करणार भाजपला मदत, Video

गृह मतदान मोहिमेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (ता. 2 मे) 228 जणांनी मतदान केले. यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक 99, इंदापूरमधील 66, दौंडमधील 39 तर भोरमधील 24 मतदारांनी मतदान केले. त्याची माहिती प्रशासनाने दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बारामती विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मिळून एकूण 106 जणांनी गृह मतदानाची परवानगी मिळण्यासाठीची पूर्वनोंदणी केली होती. परंतु यापैकी एक मतदार गंभीर प्रकृतीमुळे मतदान करून शकला नाही तर अन्य सहा मतदारांचा नोंदणीपासून ते मतदान प्रक्रियेपर्यंतच्या कालावधीत मृत्यू झाला असेही बारामती लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नमूद केले.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

दरम्यान पुणे लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम पाहणारे अधिकारी व कर्मचारी यांचे मतदान केंद्रावरील मतदानाच्या दिवशी करावयाच्या कामकाजाबाबतचे दुसरे प्रशिक्षण व ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनची हाताळणी याचे प्रशिक्षण झाले.

Edited By : Siddharth Latkar

228 voters cast their vote in home baramati lok sabha election
Voter Awareness Programme: मतदान करा हाे... मतदान करा..., मावळात वासुदेव करताहेत मतदारांची जागृती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com