मनसेच्या दिग्गज नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Senior MNS Leader and Ex-Serviceman Shashikant Patil Dies at 62:मनसे कळवण तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांचे निधन झाले असून त्यांच्या जाण्याने कळवणसह नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Late MNS leader Shashikant Patil, who played a key role in strengthening the party in Kalwan taluka.
Late MNS leader Shashikant Patil, who played a key role in strengthening the party in Kalwan taluka.saam tv
Published On

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कळवण तालुकाध्यक्ष, माजी सैनिक शशिकांत दादाजी पाटील( 62) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या निधनाने कळवण शहरात व तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. संघटन कौशल्याच्या जोरावर कळवण तालुक्यात मनसेची पक्ष बांधणी केली. राजगर्जना मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले. नाशिकच्या खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरु असतांना सोमवारी (15 जून ) सायंकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.

Late MNS leader Shashikant Patil, who played a key role in strengthening the party in Kalwan taluka.
Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासह ३० जिल्ह्यांना 'यलो अलर्ट', वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज

भारतीय सैन्यदलात सेवा केल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर कळवण शहर व तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात त्यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन मनसेमध्ये दाखल झाले.

Late MNS leader Shashikant Patil, who played a key role in strengthening the party in Kalwan taluka.
Akola Violence: अकोल्यात दोन गटात तणाव, दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; शेकडो जणांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

राजगर्जना मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवत समाजाशी घट्ट नाळ जुळवून ठेवली होती. नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार असून जतीन व अजय पाटील यांचे ते वडील होत. मंगळवारी (16 जून) सकाळी 10 वाजता कळवण येथील गिरणा संगम अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Late MNS leader Shashikant Patil, who played a key role in strengthening the party in Kalwan taluka.
Maharashtra Water Crisis: पावसाची प्रतिक्षा असताना धरणातील पाणीपुरवठा बंद; सरकारचा शेतकऱ्यांच्या वर्मावर घाव घालणारा निर्णय!

त्यांच्या पश्चात पत्नी,2 मुले असा परिवार आहे.जतीन व अजय पाटील यांचे वडील होतं. मंगळवारी (16 जून ) रोजी सकाळी 10 वाजता कळवण येथे गिरणा संगम अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com