Maharashtra Water Crisis: पावसाची प्रतिक्षा असताना धरणातील पाणीपुरवठा बंद; सरकारचा शेतकऱ्यांच्या वर्मावर घाव घालणारा निर्णय!

Government Halts Dam Water Supply : राज्यात काही भागात शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली आहे. यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे पावसाची शाश्वती नाही तर दुसरीकडे धरणातील पाणी पुरवठ्यावर घातलेल्या मर्यादा यामुळे शेतकरी मात्र दुहेरी अडचणीत सापडला आहे.

अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूना पाऊस साधारण असणार आहे. तर अद्याप राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला नाहीये. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. शेतीची कामे रखडली आहेत,पेरण्या प्रलंबित आहेत. त्याच दरम्यान सरकारनं शेतकऱ्यांच्या वर्मावर घाव घालणारा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं धरणातील पाणीपुरवठा संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. कृष्णा आणि गोदावरी नदी अंतर्गत येणाऱ्या धरणामधील पाणीपुरवठा पुढील ३ महीने थांबवण्यात येणार असल्याचा निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी घेतला आहे.

धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच वापरा, सिंचनासाठी धरणातील पाणी सोडणे बंद करा, असे स्पष्ट निर्दश देण्यात आलेत. त्या बरोबरच बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर पोलीस आणि महसूल विभागाच्या मदतीने कठोर कारवाई केली जाणार आहे. पुढचे तीन महिने नागरिकांना पिण्याच्या पाणी पुरवठा करण्याला जास्त प्राधान्य दिले जाणार आहे. दरम्यान राज्यातील धरणांमध्ये केवळ २५ टक्केच साठा शिल्लक आहे. . गेल्या वर्षीच्या जुन महिन्याच्या तुलनेत हा साठा कमी आहे. मान्सुनच्या विलंबामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. पाणी व्यवस्थापनाचा कृती आराखडा तयार करण्याचा सुचना दिल्या आहेत. त्यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि मराठवाडा विभागातील जलाशयांमध्ये पाण्याची नवीन आवक सुरु होईपर्यत उपलब्ध पाण्याचा जपून वापर करण्याकडे लक्ष असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com