शिंदेंच्या आमदाराची गुंडगिरी कधी थांबणार? छत्रपती शिवरायांचा आदर करताना जीभ घसरली, ऑडिओ क्लिप व्हायरल

Sanjay Gaikwad viral audio clip news : छत्रपती शिवरायांचा आदर करताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली आहे. दिवगंत गोविंद पानसरे यांच्या पुस्तकावरुन आमदार गायकवाड यांनी थेट प्रकाशकाला शिवीगाळ केल्याचे समोर आलं आहे.
Sanjay Gaikwad news
Sanjay GaikwadSaam tv
Published On
Summary

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात

आमदार संजय गायकवाड यांची प्रशांत आंबी यांना शिवीगाळ

आमदार गायकवाड आणि आंबी यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल

बुलढाणा : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कोल्हापूरचे कॉम्रेड प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. बुलढाण्यातील एका लग्नात आंबी यांनी 'शिवाजी कोण होता?' या पुस्तक वाटल्याने संजय गायकवाड संतापले. गोविंद पानसरेंचे काय झालं माहिती आहे ना? तुझी जीभ छाटून टाकीन, अशा शब्दात गायकवाड यांनी आंबी यांना धमकावलं. दोघांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असून राज्यात खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी थेट प्राध्यापक गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून शिवीगाळ केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचं अनादर करणारे शीर्षक या पुस्तकाला दिल्याचे म्हणत आमदार गायकवाड यांनी आंबी यांच्यावर शिवीगाळ केली. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ऑडिओ क्लिप कधीची आहे, याबद्दल स्पष्टता नसली तरी या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही. सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com