NCP Polical Crisis
NCP Polical CrisisSaam tv

NCP Crisis: शरद पवारांना मोठा धक्का! आमदार मकरंद पाटील यांचा यू-टर्न, थेट अजित पवारांना दिला पाठिंबा

NCP Crisis: राष्ट्रवादीच्या फूटीनंतर शरद पवारांच्या कारमधून प्रवास करणाऱ्या आमदार मकरंद पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा जाहीर केला आहे.
Published on

Mumbai News: अजित पवारांनी बंड करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याने राष्ट्रवादीतील काही आमदार द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या फूटीनंतर शरद पवारांच्या कारमधून प्रवास करणाऱ्या आमदार मकरंद पाटील यांनी आता अजित पवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. (Latest Marathi News)

आमदार मकरंद पाटील यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह देवगिरी बंगल्यावर जाऊन अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर मकरंद पाटील यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर यावेळी अजित पवारांनी मकरंद पाटील यांना मंत्रिपद देण्याची घोषणा केली.

NCP Polical Crisis
Sanjay Raut News: भाजपात गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण... ; संजय राऊतांकडून शरद पवारांचा मुद्दा सांगत हल्लाबोल

दरम्यान, मकरंद पाटील यांचे नाव मंत्रिपदाच्या यादीत होते. मात्र, शरद पवार यांच्या घराण्याशी चांगले संबंध असल्याने ते द्विधा मनस्थितीत होते. त्यामुळे अजित पवारांना कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय कळवतो, असे सांगितले होते.

राष्ट्रवादीच्या फूटीनंतर शरद पवारांनी माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केलं. त्यावेळी मकरंद पाटील यांनी शरद पवारांच्या वाहनातून प्रवास केला होता. त्यामुळे मकरंद पाटील यांचा शरद पवारांना पाठिंबा असल्याची चर्चा होती.

NCP Polical Crisis
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याआधीच वातावरण तापलं; वर्ध्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना नेमकी कसली भीती?

त्यानंतर काल दुपारी वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील शेकडो कार्यकर्त्यांसह मकरंद पाटील हे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले. यावेळी त्यांनी अजित पवारांसोबत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुनील तटकरे, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.

या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले, 'आपली सर्वांची कामे झाली पाहिजेत. महाराष्ट्र राज्य पुढे गेलं पाहिजे. केंद्र सरकारचं सहकार्य असेल तर राज्याला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com