Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Saam TV

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याआधीच वातावरण तापलं; वर्ध्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना नेमकी कसली भीती?

Uddhav thackeray News: राज्याच्या घडामोडीनंतर आता उद्धव ठाकरे यांनीही शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली आहे.
Published on

चेतन व्यास

wardha News: अजित पवारांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिल्याने राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांनी बंड करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी दंड थोपाटले आहेत. राज्याच्या घडामोडीनंतर आता उद्धव ठाकरे यांनीही शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली आहे.

राज्यातील भूकंपानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिला दौरा विदर्भात जाहीर केला आहे. या दौऱ्याआधीच विदर्भाच्या वर्ध्यात वातावरण तापलं आहे. या दौऱ्यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटावर तोफ डागली आहे. (Latest Marathi News)

ठाकरे गटाचे वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

निलेश धुमाळ म्हणाले, 'संपूर्ण महाराष्ट्राने 2022 साली घडलेला प्रसंग बघितला आहे. शिवसेनेचे आमदार मुंबई, ठाणे, सुरत गुवाहाटीमार्गे परत मुंबई असा प्रवास केला. एक वर्ष होऊन आजही त्यांच्या मागे पोलिसांच्या दोन गाड्या आहेत. आजही त्यांना शिवसैनिक आपल्यावर हल्ला करतील अशी भीती आहे'.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Sharad Pawar Speech: 'म्हणून मी माफी मागायला आलोय...' येवल्याच्या विराट सभेत असं का म्हणाले शरद पवार?

शिवसैनिकांची दहशत- धुमाळ

धुमाळ पुढे म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे घडलं त्यात आणि शिवसेनेत घडलेल्या बंडात एवढंच फरक आहे. राष्ट्रवादीचे आमदार विरोधी पक्ष नेता अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यातून थेट राजभवनात गेले आणि ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. शिवसेनेतून गेलेल्या आमदारांना खऱ्या शिवसैनिकांची दहशत नेहमीच राहील'.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Sharad Pawar News: "वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल.." भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार कडाडले...

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

'शिंदे गटाच्या लोकांना आपल्या जीवाची भीती आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले नाही, तरी त्यांना एवढी भीती वाटते. आदेश आला तर काय होईल, त्यामुळे ते आपल्या मागे पुढे सुरक्षेसाठी प्रशासनाच्या गाड्या वापरतात, अशी टीकाही धुमाळ यांनी शिंदे गटावर केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com