Sharad Pawar Speech: 'म्हणून मी माफी मागायला आलोय...' येवल्याच्या विराट सभेत असं का म्हणाले शरद पवार?

Ajit Pawar Vs Sharad Pawar: येवल्याच्या विराट सभेत बोलताना भरत पवारांनी बंड करणाऱ्या आमदारांविरोधात जोरदार हल्लाबोल केला..
Sharad Pawar News
Sharad Pawar Newssaam tv
Published On

Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी आता थेट राष्ट्रवादी पक्षावरच दावा केला आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार यांनीही मैदानात उतरत दंड थोपटले असून आज त्यांची पहिली सभा येवल्यात होत आहे. या विराट सभेत बोलताना भरत पवारांनी बंड करणाऱ्या आमदारांविरोधात जोरदार हल्लाबोल केला.. (Maharashtra Politics)

Sharad Pawar News
Sharad Pawar News: मै फायर हूँ.. बंडखोरी करणारे सगळे पराभूत होतील; नाशिकमधून शरद पवारांचा हल्लाबोल

काय म्हणाले शरद पवार...

येवल्याच्या सभेत बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाशिककरांची माफी मागायची असल्याचे मोठे विधान केले. "मी इथे कोणावर टीका करण्यासाठी किंवा कोणाचे कौतुक करण्यासाठी आलो नाही;तर मी जनतेची माफी मागायला आलोय असे ते यावेळी म्हणाले. माझा अंदाज कधीच चुकत नाही, मात्र यावेळी माझा अंदाज चुकला. या चुकीमुळे तुम्हाला त्रास झाला पण मी अशी चूक पुन्हा करणार नाही.." अशा शब्दात त्यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला.

वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल...

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर शरद पवार यांच्या वयावरुन चांगलाच वाद रंगला होता. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करत टीका केली होती. त्याचाही शरद पवार यांनी समाचार घेतला. काहीही बोला पण वयाचा उल्लेख महागात पडेल.." असा थेट इशारा त्यांनी टीका करणाऱ्यांना दिला.

Sharad Pawar News
Samruddhi Mahamarg Accident : 'समृद्धी'चं भयावह वास्तव; ७ महिन्यांत १००० अपघात, १०६ मृत्यू; तज्ज्ञांनी सांगितली कारणं

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल...

यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या पक्षावर, सहकाऱ्यांवर अनेक आरोप केले. जर असे काही असेल तर तुमची सगळी ताकद वापरा आणि आणि चौकशी करा. त्यासाठी आमचा सर्वांचा पाठिंबा राहिल; आणि दोषींना कडक शिक्षा करा.." अशी खोचक टीका यावेळी त्यांनी केली. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com