Sanjay Raut News: भाजपात गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण... ; संजय राऊतांकडून शरद पवारांचा मुद्दा सांगत हल्लाबोल

Sanjay Raut News: संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोक सदरातून अजित पवार गटाला देशबुडवा म्हणत निशाणा साधला आहे.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSaam tv
Published On

Sanjay Raut News: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीही खिळखिळी झाल्याचं बोललं जात आहे. या राजकीय भूकंपावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोक सदरातून अजित पवार गटाला देशबुडवा म्हणत निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

संजय राऊत यांनी राज्यातील घडामोडीवरून शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांना दैनिक सामनातील रोखठोक सदरातून लक्ष्य केलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाची आठवण भाजपला करून दिली. ' आपला देश बुडविणाऱ्यांपैकी महाराष्ट्रातील अजित पवारांसह जवळपास 40 आमदारांना भाजपात घेऊन 'पवित्र' करण्यात आले. याआधी असे अनेक 'देशबुडवे' भाजपने पवित्र करून घेतले, अशी टीका राऊत यांनी अजित पवार गटावर केली आहे.

Sanjay Raut News
Solapur Politics: सोलापुरात भाजपला मोठा धक्का! चार माजी नगरसेवकांसह 500 कार्यकर्त्यांचा बीआरएसमध्ये प्रवेश

'नव्याने भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांना आता शांत झोप लागेल. केंद्रीय यंत्रणांचा वापर राजकीय हत्यारासारखा सुरू आहे. पाकिटमारांना आता टाकायचे व दरोडेखोरांना भाजपात प्रवेश देऊन शुद्ध करायचे असे एकंदरीत धोरण आहे. कालचे देशबुडवे एका रात्रीत देशभक्त कसे होतात ते महाराष्ट्रात दिसले, अशी टीका राऊत यांनी केली.

'शरद पवार यांनी तेव्हा एक चांगला मुद्दा मांडला होता तो म्हणजे, 'आज जे ईडी वगैरेच्या भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही भाजपात गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण या फायली कधीच बंद होत नाहीत, असं म्हणत राऊतांनी अजित पवार गटाला इशारा दिला आहे.

Sanjay Raut News
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याआधीच वातावरण तापलं; वर्ध्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना नेमकी कसली भीती?

'शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 80 आमदार फोडून त्यांच्या हाती राज्याच्या चाव्या दिल्या. लुटीचा खुला परवाना दिला. हा देश बुडवण्याचाच प्रकार आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष त्यांनी लावला. आता अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष लावला आहे. त्यानंतर भाजपचे व्यापारी बादशहा दिल्लीत बसून मजा बघत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. 'देशबुडव्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची हास्यजत्राच केली आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com