Solapur News: सोलापुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. सोलापुरात भाजपच्या राजीनामा दिलेल्या ४ माजी नगरसेवकांनी आणि एका बड्या शिक्षण संस्थेच्या सचिवासह पाचशे कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत या सर्वांनी पक्षात प्रवेश केला आहे. (Latest Marathi News)
सोलापुरातील चार माजी नगरसेवक, शिक्षण संस्था सचिव आणि पाचशे कार्यकर्त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश करण्यासाठी शंभरहून अधिक वाहने घेऊन हैदराबाद गाठलं. या सर्वांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला.
भाजपचे दिवंगत नेते, माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र नागेश वल्याळ, संतोष भोसले, राजश्री चव्हाण आणि जुगनबाई आंबेवाले या चार माजी नगरसेवकांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता.
तसेच शंभर वर्षे जुन्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनीही बीआरएसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे सर्वजण ५०० कार्यकर्त्यांसह हैदराबादकडे रवाना झाले. सायंकाळी ज्युबिली हिल्स भागातील बीआरएस भवनात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, अर्थमंत्री हरीश राव आदींनी वल्याळ यांच्यासह ५०० कार्यकर्त्यांचे पक्षात प्रवेश देऊन स्वागत केले.
खासदार लिंगराज वल्याळ यांचे सुपुत्र नागेश वल्याळ यांनी यावेळी भाजप सोडत असल्याने दु:ख व्यक्त केले. तसेच वल्याळ यांनी सोलापुरातील भाजप नेतृत्वावर टीका केली. तसेच स्थानिक आमदारांवरही नाराजी व्यक्त केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे नेतृत्वही मान्य केलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.