Milk Price Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा झटका! दूधाच्या दरात मोठी वाढ, नवे दर जाणून घ्या

Maharashtra Milk Price Hike: महाराष्ट्रात गायीच्या आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर ४ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ४५ दूध ब्रँडच्या प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय झाला. अमूल आणि मदर डेअरीच्या दरवाढीनंतर आता ग्राहकांच्या घरखर्चावरही परिणाम होणार आहे.
Milk Price Increase
Milk Price Increasesaam tv
Published On: 

महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी एक झटका बसणार आहे. राज्यात दूध विक्रीच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर ४ रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना दूध खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. राज्यातील सर्व ब्रँडचे दूध या दरवाढीमुळे महागणार आहे.

दूध उत्पादक आणि व्यावसायिक कल्याणकारी संघाची आज पुण्यात बैठक झाली. पुण्यातील कात्रज डेअरीच्या कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला राज्यातील ४५ सहकारी आणि खासगी दूध ब्रँडचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत दुधाच्या दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गाय आणि म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर ४ रुपयांची वाढ केली जाणार आहे.

Milk Price Increase
Jalna Crime News: शेतात सोन्याने भरलेले सात हंडे! कुंकू, लिंबू, नारळ सोन्यासाठी शेतात अघोरी पुजा; जालन्यातील धक्कादायक प्रकार

दूध महागण्यामागे नेमकं कारण काय?

दूध उत्पादकांच्या म्हणण्यानुसार, सध्या दूध व्यवसायाचा खर्च वाढतोय. डीलर रेटमध्ये झालेला बदल, बाहेरील दूध ब्रँडचं वाढतं आक्रमण आणि साखर व डिझेलच्या दरात झालेली वाढ यामुळे दूध विक्रीचे दर वाढवावे लागत आहेत. त्यामुळे सर्व ब्रँडच्या दुधाचे दर प्रतिलिटर ४ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमूलनेही वाढवले दुधाचे दर

दरम्यान अमूलनेही १२ नोव्हेंबर २०२६ पासून पॅकबंद दुधाच्या किमतीत प्रतिलिटर २ ते ६ रुपयांनी वाढ केली आहे. अमूल ताजाच्या दरात २ रुपये, अमूल गोल्डच्या दरात ४ रुपये, तर फुल क्रीम म्हशीच्या दुधाच्या दरात ६ रुपयांची वाढ झाली आहे. मदर डेअरीनेही दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Milk Price Increase
अजितदादा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार नाही? छगन भुजबळांनी सांगितला राजकीय तिढा

पशुखाद्य, चारा, वाहतूक आणि पॅकेजिंगचा वाढता खर्च तसेच कमी पावसामुळे काही भागांत दूध उत्पादनावर झालेला परिणाम हीदेखील दरवाढीमागची कारणं सांगितली जातायत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा खरेदी दर आणि व्यवसायाचा खर्च सांभाळण्यासाठी कंपन्यांकडून दरवाढ केली जात आहे. या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरखर्चावर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.