मावळ : राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजविला आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. त्यानुसार मावळ तालुक्याला देखील पावसाने अक्षरशः झोडपले असून पावसाची संततधार सुरू असून कुंडमळा येथील इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान कुंडमळा येथील छोट्या पुलावर धोकादायक वाहतूक सुरूच असल्याचे पाहण्यास मिळत आहे.
मावळ (Maval) तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंडमळा येथील इंद्रायणी नदीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. लोणावळ्यात (Lonavala) उगम पावणारी नदीत पावसाच्या पाण्याने नदी पात्रात मोठी वाढ झाली आहे. तर पिंपरी- चिंचवड आणि पुणेकरांचे आकर्षण असणारे कुंडमळा धबधबे वाहू लागलेत. मात्र याच कुंडमळ्याकडे जाणाऱ्या छोट्या पुलावर वाहन चालक धोकादायक वाहतूक करत असल्याचं चित्रं दिसून येत आहे. पाण्याची पातळी वाढली असताना हा फाजीलपणा जीवावर बेतू शकतो.
लोणावळा येथे काही दिवसांपूर्वी धबधब्यावर गेलेले पर्यटक वाहून गेल्याने ५ जणांचा मृत्यू झाला होता. तरी देखील पर्यटक धबधबा व नदीवर जात असल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान धोक्याची पातळी गाठलेल्या (Indrayani River) इंद्रायणी नदीत जाताना बरेचसे पर्यटक दिसत आहे. येथे जाऊन रिल्स बनविणे व सेल्फी काढण्यास व्यस्त असल्याचे पाहण्यास मिळत आहे. याठिकाणी पोलिसांचा मोठा ताफा असूनही पोलिसांना जुमानत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.