बालाजी सुरवसे
धाराशिव : महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करून महिलांना दर महिन्याला १ हजार रुपये देणार आहे. याकरिता महिलांचे बँक खाते आवश्यक आहे. बऱ्याचशा महिलांचे बँक खाते नसल्याने त्यांची खाते उघडण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. याकरिता धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेने पुढाकार घेतला असून लाडक्या बहिणींसाठी १०० रुपयात बँक खाते उघडून देणार आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या परंतू कोणत्याही बॅंकेत खाते नसलेल्या महिलांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Bank) मदतीचा हात पुढे केला आहे. केवळ १०० रुपये भरून संबधित महीलेला खाते उघडता येणार आहे. अन्य राष्ट्रीयकृत बॅंकामध्ये खाते उघडण्यासाठी किमान दोन ते पाच हजार रुपये भरावे लागतात. (Dharashiv News) सध्या योजनेसाठी अर्ज भरणे सुरू आहे. यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करण्यासोबत बँक खाते उघडण्यासाठी महिलांची धावपळ सुरु आहे. या अनुषंगाने डीसीसी बँकेने निर्णय घेतला आहे.
मात्र अनेक महिलांचे बॅंकेत खाते नाही. ज्या महीलांचे जनधन योजनेंतर्गत खाते उघडण्यात आले. त्या महीलांना अर्ज भरल्यावर आपोआप याचा फायदा होणार आहे. परंतु विवाह झालेल्या महीलांचे सासरी तर नुकतेच २१ वर्षे झालेल्या मुलींचे खातेच उपलब्ध नाही. ही गरज ओळखून या योजनेसाठी लाभार्थी असलेल्या सर्व प्रकारच्या महीलांसाठी डीसीसी बॅंकेने १०० रुपयात खाते उघडण्याची योजना सुरू केल्याची माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.